घरातील सर्व कामे आपल्याला हाताने करावी लागतात, त्यामुळे आपले नखं कमकुवत होतात आणि तुटून पडतात. आजकाल नेलआर्ट करण्याच ट्रेंड आहे. पण त्यासाठी लांब आणि सुंदर नखं असायला हवेत तरंच आपले नेलआर्ट आकर्षक दिसेल. सुंदर नेलआर्ट केल्यावर नखं तुटणे हे मुलींसाठी खूप दुःखाची गोष्ट असते. अहो हसू नका... खरंच नखांवर सुंदर कलाकृती करणे हे दिसायला सोपं पण करायला अवघड काम आहे. म्हणूनच हातांच्या नखांची विशेष काळजी घ्यायला हवी. चला तर जाणून घेऊयात कशाप्रकारे घ्यावी नखांची काळजी...
- नखं कोमट पाण्यात बुडवून ठेवल्याने सुंदर आणि मजबूत होतात.
-नखांना सतत नेलपॉलिश लावून ठेऊ नका. त्यांना हवा लागणे तितकंच गरजेचं आहे.
- रात्री झोपण्यापूर्वी नखांना ग्लिसरीन लावा. वेदना आणि जळजळीपासून सुटका होईल.
- नखांवर बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल नियमितपणे लावा.
- डाळिंबाची पानं वाटून बांधल्याने नखं तुटल्यावर होणाऱ्या वेदना कमी होतात.
- निरोगी नखांसाठी आहारात दूध, हिरव्या भाज्या, पनीर, दही आणि अंड्याचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा.
- कपडे किंवा भांडी धुताना रबरी हातमोजे वापरा.
- वॉशिंग पावडर किंवा डिटर्जंटमुळे नखं आणि हात खराब होतात म्हणूनच काम झाल्यावर हातांना व नखांना लोशन किंवा क्रीम लावा.
- नखं कापण्यापूर्वी ५ मिनिट कोमट पाण्यात बुडवून ठेवा म्हणजे नखं सहजपणे कापता येतात.
- बोटांच्या पेरांना मालिश केल्यानं सर्क्युलेशन वाढून नखं मजबूत बनतील. पेरांना मालिश करण्यासाठी नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा.
- नखं कुरतडण्याची सवय सोडा.
- दोन लिंबाचा रस एका ग्लासात घ्या. त्यात बदामाचं तेल मिसळून ग्लासमध्ये नखं बुडवा. सलग १५ ते २० दिवस हा प्रयोग केल्यानं नख मजबूत होतात.
- लिंबाची साल नखांवर चोळल्याने ती बळकट होतात.
- कोमट केलेल्या ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन इ ची कॅप्सूल मिसळा. रोज झोपण्यापूर्वी आपली नखं या मिश्रणात १० मिनटं बुडवा. नंतर नखांना हलकी मसाज करा. यामुळे नखं लवकर वाढतात.
- आठवड्यातून दोनदा नखांवर नेलं स्ट्रेन्थर लावा.
- झोपण्यापूर्वी नखं आणि क्युटिकल्सना बेबी ऑईलने मसाज करा. नंतर त्यावर क्रीम लावा.
- आपल्या शरीराप्रमाणेच नखांनादेखील हायड्रेशनची गरज असते. म्हणून भरपूर पाणी प्या.
- नेल पॉलिश सुकू नये म्हणून नेलं पॉलिशमध्ये नेल वॉर्निशचे काही थेंब मिसळा आणि बॉटल फ्रिजमध्ये ठेवा.
Tags:
Nails