मस्कारा वापरण्यासंबंधित अशा काय विशेष टिप्स असतील?... असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पण मेकअप करताना बऱ्याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांचे मेकअप करताना तर विशेष काळजी घ्यायलाच हवी. कारण डोळे आपल्या अंगाचा विशेष आणि नाजूक भाग आहेत. म्हणून डोळ्यांवर मेकअप प्रोडक्स वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या पापण्या जर मोठ्या आणि जाड असतील तर डोळे अजूनच सुंदर दिसतात. पण ज्यांच्या पापण्या पातळ असतात त्यांना मस्कारा वापरावा लागतो आणि मस्कारामुळे डोळ्यांचे सौंदर्य अधिकच खुलते. चला तर जाणून घेऊयात मस्कारा वापरण्यासंबंधित खास टिप्स...
- जर डोळ्यांवर जास्त आयशॅडो लागलं असेल तर वरच्या पापण्यांवर आतील कोपऱ्यापासून टोकापर्यंत मस्कारा लावा. त्यासारखेच खालच्या पापण्यांवरदेखील मस्कारा लावा.
- मस्कारा लावताना नेहमी आधी खालच्या पापण्यांवर नंतर वरच्या पापण्यांवर लावा.
- मस्कारा उघडल्यानंतर तीन महिन्यापर्यंतच त्याचा वापर करा. कारण काही महिन्यांतच त्यामध्ये बॅक्टेरियाज तयार होऊन वाढू लागतात, जे डोळ्यांसाठी घातक ठरतात.
- मस्कारा लावण्यापूर्वी पापण्यांवर ट्रान्सलुसंट पावडर लावा.
- डोळ्यांवर जर अधिक मस्कारा लागला असेल, तर डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांमध्ये टिश्यू पेपर ठेवा आणि दोन तीनदा पापण्यांची उघडझाप करा. अनावश्यक मस्कारा निघून जाईल.
- जर तुम्हाला जवळचा किंवा वाचायचा चष्मा असेल तर तुम्ही डार्क आयशॅडो आणि जास्त मस्कारा लावा. यामुळे तुमचे डोळे छान उठून दिसतील.
- रंगीत मस्कारा तुमच्या डोळ्यांना अधिक आकर्षक बनवतो. सुरुवातीला काळ्या मस्काऱ्याचे दोन कोट लावा. ते सुकल्यावर हलकासा रंगीत मस्कारा लावा.
- चॉकलेटी आणि ब्राऊन रंगाचा मस्कारा हिरव्या आणि ब्राऊन डोळ्यांवर उठावदार दिसतो.
- मस्कारा नेहमी कोरड्या आणि गार असलेल्या ठिकाणी ठेवा.
- वॉटरप्रूफ मस्कारा जास्त काळ टिकतो म्हणून शक्यतो त्याचाच वापर करावा.