सुरकुत्या पडणे म्हणजे स्त्रियांचे सौंदर्य कमी होणे होय. बऱ्याच स्त्रिया सुरकुत्यांपासून हैराण असतात. त्या पडू नयेत म्हणून तुम्ही काही सोपे व्यायाम लक्षात घेतले पाहिजेत. चला तर जाणून घेऊयात सुरकुत्या पडू नयेत म्हणून काही सोपे व्यायाम....
डोळे
-डोळे घट्ट बंद करा. अंगठे डोळ्यांच्या बाहेरच्या कडेवर ठेवा आणि त्वचा वरच्या दिशेला खेचा.
- तर्जनी भुवयांच्या खाली ठेवा आणि डोळे बंद करून त्वचा खेचा.
- डोळे अर्धवट बंद करून भुवया शक्य तितक्या वर उंचावण्याचा प्रयत्न करा. काही क्षण याच स्थितीत थांबा. आता थोडा वेळ विश्रांती घ्या.
- डोळे उघडून सरळ उभे रहा. डोके न हलवता वर खाली उजवीकडे, डावीकडे बघण्याचा प्रयत्न करा.
- तीव्र प्रकाश पडल्यावर आपण डोळे बारीक करतो, तस करा.
ओठ
- ताठ बसा. ओठांचा चंबू करा. चंबू केलेले ओठ एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे वळवा. ही क्रिया किमान दहा वेळा करा.
- ओठ एकमेकांना चिकटवून ठेवा आणि याच स्थितीत हसा.
कपाळ
- डोळ्यांवर अंगठे ठेवा. पापण्या खालच्या बाजूला झुकवा आणि भुवया वरच्या दिशेला उंचवा.
- हातांची बोटे कपाळावर ठेवा आणि बोटं दबलेल्या स्थितीत त्वचा वरच्या दिशेला खेचा.
त्वचा
- सरळ बसा. शक्य तितके डोळे मोठे करा आणि जीभ बाहेर काढून संपूर्ण चेहरा ताणा.
- दीर्घ श्वास घ्या आणि संपूर्ण चेहरा आकुंचित करा. तोंडाने श्वास घेत चेहरा पूर्वीसारखा करा.
- तोंड बंद ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि हवेने तोंड फुगवा. नंतर डाव्या गालाकडून उजव्या गालाकडे हवा शिफ्ट करा. दहा सेंकंद तसेच ठेवा. आता विरुद्ध गालात हवा वळवा. दहा सेकंद थांबा. आता थोडा वेळा विश्रांती घ्या.
- सरळ बसा, मान शक्य तितकी मागे घ्या आणि छताकडे बघण्याचा प्रयत्न करा, ओठांचा चंबू करा. दहा सेकंद असेच थांबा. आता चेहरा पूर्वस्थितीत आणा.
सर्वांगासन
पाठीवर उताणे झोपा. दोन्ही पाय एकमेकांना जोडा आणि हात जमिनीवर ठेवा. हातांनी जमिनीवर भर देत पाय उचलण्याचा प्रयत्न करा. ९० अंशापर्यंत पाय वर उचला. हातांचा आधार देऊन कंबर वर उचला आणि पाय डोक्याच्या दिशेने न्या. काही क्षण याच स्थितीत रहा. नंतर सावकाश पाय खाली आणा.
या आसनांमुळे सुरकुत्या येण्याला आळा बसतो व हातापायांना मजबुती येते. मात्र वरील व्यायाम तज्ज्ञांच्या सल्य्याने करा.