पौष्टिक पण चविष्ट! 'पौष्टिक स्प्राऊट पराठा' जाणून घ्या विधी...



तुम्ही नियमित व्यायाम करत आहात किंवा आपल्या फिगरबद्दल जास्तच कॉन्शियस आहात, तर नक्कीच तुम्ही
तुमचा एक चांगला डाएट बनवला असेल. पण त्या आहारामध्ये चविष्ट पदार्थ असणे जरा  कठीणंच आहे. डाएटवर असल्यावर विशेषतः बोअरींग फूडच आपल्याला जास्त खावं लागतं. पण तुम्ही एखादा असा पदार्थ का नाही ट्राय करत जो पौष्टिक आणि चविष्ट दोन्ही असेल. असा पदार्थ आहे? तर नक्कीच आहे तो म्हणजे 'पौष्टिक स्प्राऊट पराठा'. चला तर जाणून घेऊयात पौष्टिक स्प्राऊट पराठा बनवण्याची विधी... 
  
साहित्य: मोड आलेले मटकी, मूग, हरभरा, मसूर, चवळी प्रत्येकी पाव वाटी, हरभरा डाळीचे पीठ पाव वाटी, धने -जिरे पावडर २ ते ३ चमचे, तिखट ३-४ चमचे, ओल्या खोबऱ्याचे चव १/२ वाटी, चवीनुसार मीठ, तेल अर्धी वाटी, कणिक २-३ वाट्या, आलं-लसूण पेस्ट २-३ चमचे हळद, जिरे. 


कृती: 
आधी तेल. मीठ घालून कणिक मळून झाकून ठेवावी. कढईत तेल गरम करून जिऱ्याची फोडणी करून त्यामध्ये मोड आलेले मटकी, मूग, हरभरा, मसूर, चवळी मिक्सरमध्ये भरड करून घालावी. चांगले परतून त्यामध्ये मीठं, धने पावडर, हळद, आले-लसूण पेस्ट, ओल्या खोबऱ्याचा चव, तिखट, हरभरा डाळीचे पीठ घालून चांगले परतून घ्यावे. हे तयार झालेले सारण कणकेच्या पारीमध्ये भरून पराठा करावा. तेल सोडून भाजून घ्यावा. चटणी, सॉस, लोणचे लोण्याबरोबर हि डिश सर्व्ह करा.  
हा पराठा अतिशय पौष्टिक आहे.   







Previous Post Next Post