नक्की वाचा! चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी, चेहऱ्याच्या आकारानुसार भुवयांच्या आकार कसा असावा? ...

कुठल्याही महत्त्वाच्या वेळी आपलं सौंदऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव असू नये, असे वाटणे साहजिक आहे. कुठेही कार्यक्रमात जायचं म्हटल्यास आपल्या मैत्रिणीच्या तोंडचं 'पहिलं' वाक्य म्हणजे ''यार, आयब्रो करावी लागेल" हा असतो. एकदाचं मेकअप शिवाय तुम्ही कार्यक्रमात जाण्याचं विचार करू शकता पण थ्रेडींग शिवाय जाण्याची शक्यता ही कमीच असते. यावरून चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी भुवयांचे योगदान किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. भुवया व्यवस्थित कोरलेल्या असाव्यात म्हणजे तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य उठून दिसेल. भुवयांच्या आकार हा तुमच्या चेहऱ्याच्या आकारावर अवलंबून असतो. पण भुवयांची लांबी नेहमी तुमच्या डोळ्यांच्या लांबीपेक्षा जास्त असावी. 

 गोल चेहरा - 

गोल चेहऱ्यावर नेहमी पर्वताकार म्हणजेच कोन असलेल्या भुवया रेखाव्यात. कारण गोलाकार भुवयांमुळे चेहरा अजूनच गोल दिसतो. 

उभट चेहरा -

उभट चेहऱ्यावर गोलाकार भुवया शोभून दिसतात. यामुळे चेहरा थोडासा गोलाकार दिसतो. 

मोठा चौकोनी चेहरा -

असा चेहरा असणाऱ्यांनी भुवया गोलाकार ठेवाव्यात आणि टोकाला कानाच्या दिशेने वळवाव्यात. यामुळे चौकोनी चेहरा दिसणार नाही. 

पातळ चेहरा - 

पातळ चेहरा असणाऱ्यांनी जाड व कमानदार भुवया ठेवाव्यात. लांब आणि बारीक भुवया ठेऊ  नयेत. 

अंडाकृती चेहरा-

असा चेहरा असणाऱ्यांनी सरळ व जाड भुवया ठेवाव्यात. 


त्रिकोणी चेहरा- 

त्रिकोणी चेहऱ्यावर दाट आणि सरळ भुवया शोभून दिसतात. 

भुवयांसाठी काही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा:

-जर तुमच्या भुवया पातळ असतील तर ब्राऊन रंगाची आयब्रो पेन्सिल लावा. 

- भुवया दाट असतील तर पेन्सिल फिरवताना स्ट्रोक द्या. 

- भुवया जर फिक्या रंगाच्या असतील तर काजळ लावून हलकेच पुसा. यामुळे भुवया काळ्याभोर आणि दाट दिसतील. 

भुवयांची नेहमी आणि योग्य काळजी घेतल्यामुळे भुवया दाट, काळ्याभोर आणि सुंदर बनतील. 


Previous Post Next Post