जाणून घ्या, हेअर ड्रायर वापरताना घ्यावयाची काळजी...


हेअर ड्रायर हे उपकरण मुलींच्या रुटीनमधील महत्त्वाचे उपकरण आहे. मुलींच आपल्या केसांवर खूप प्रेम असतं आणि म्हणूनच आपले केस अधिक सुंदर आणि स्वस्थ बनवण्याकरता मुली बरेच प्रसाधन आणि उपकरण वापरत असतात. बऱ्याचदा केस वाळवण्यासाठी आणि सेट करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो. पण ड्रायरचा वापर नियमित करणे शक्यतो टाळा. केस नैसर्गिकरित्याच वाळू दिलेले केसांच्या स्वास्थ्याकरता योग्य असते. चला तर जाणून घेऊयात, हेअर ड्रायरचा वापर करताना घ्यावयाची काळजी... 

- नेहमी चांगल्या कंपनीचे हेअर ड्रायर घ्या. हिट आणि स्पीड कंट्रोल करण्याची सोय असलेले ड्रायर निवडा. 

- ड्रायर वापरताना नेहमी फिल्टर लावूनच वापरा नाही तर केस मशीनमध्ये अडकण्याची शक्यता असते. 

- ब्लो ड्राय केल्यानंतर केस चांगले थंड होऊ द्या. 

- हेअर ड्रायर त्वचेच्या जास्त जवळ आणून नका, नाही तर त्वचेला इजा होईल. 

- जास्त गरम मोडवर ड्रायर ठेऊ नका, अन्यथा केस खराब होतील. 

- ड्रायर वापरताना नेहमी खालच्या बाजूने त्याचा रोख हवा. ज्यामुळे क्युटिकल्स नरम होतील आणि केस चमकदार बनतील. 



-चांगल्या फिनिश आणि स्टाईलसाठी एअर स्टाइलर कमी स्पीडवर वापरा. 

- इलेक्ट्रिक ड्रायरचा वापर करताना हाथ पूर्णपणे कोरडे हवेत. तसेच त्याचा पाण्यांशी संपर्क येत काम नये, अन्यथा शॉक बसू शकतो. 

- रुक्ष, निस्तेज आणि लहान केस वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर करणं टाळा. 
Previous Post Next Post