जाणून घ्या, चाळिशीनंतरच्या मेकअप टिप्स आणि मिळवा तरुण,आकर्षक लुक...

चाळीशीनंतर तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी आहारविहार तर बदलायला हवंच, पण त्यासोबत आपल्या मेकअपची स्टाईल, पोषाखदेखील बदलायला हवेत. योग्य प्रकारे मेकअप करून , साजेसा पोषाख वापरून तुम्ही एक प्रसन्न लुक मिळवू शकता... 

- फाउंडेशन आणि पावडरचे थरच्या थर लावू नका. अत्यंत हलके फाऊंडेशन व त्यावर कॉम्पॅक्ट पावडरचा हलका थर लावा. जेणेकरून तुम्हाला नॅचरल लुक मिळेल. 

- मेकअप करताना आधी चेहरा, मानेवर मॉइश्चरायझर लावा ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा जाईल. आता चेहऱ्यावर  बेस क्रीम लावा आणि त्यावर अल्ट्राफाइन पावडरचा हलका हात फिरवा. 

- आयलायनर लावत असल्यास जाड लाईनच्या ऐवजी बारीक लाईन लावा. पापण्यांवर लावलेल्या मस्कऱ्यामुळे तुम्हाला आकर्षक रूप मिळेल.      

-  डार्क रंगाच्या लिपस्टिकऐवजी फिक्कट पण ब्राईट रंगाची लिपस्टिक वापरा.  नेहमी मॉइश्चरायझरयुक्त लिपस्टिक वापरा, यामुळे ओठ नरम राहतात. लिपस्टिक लावल्यावर नॅचरल रंगाचा कलर ग्लॉस लावा. 

- कॉम्प्लेक्शन चांगलं दिसावं यासाठी ब्लशर अवश्य लावा जेणेकरून तुमची त्वचा फ्रेश दिसेल. वाढत्या वयासोबत त्वचेची चमक कमी होते म्हणूनच हलके पण नॅचरल दिसेल असं ब्लशर लावा. 

- एक उत्तम हेअरस्टाईल तुम्हाला दहा वर्षांनी तरी तरुण बनवते. पण हाय पोनी किंवा चेहऱ्यावर बटा येतील अशी स्टाईल करू नका. केस जास्त घट्ट न बांधता सैलसर बांधा. लेयर कट करा. 

- फाऊंडेशन निवडताना नेहमी नॉर्मल शेडपेक्षा एक शेड लाईट क्रीम बेस फाउंडेशन निवडा. 

- हेअर कलर करताना केसांच्या नैसर्गिक रंगापेक्षा दोन शेड लाईट कलर निवडा. 

- भुवयांच्या आकार नेहमी नैसर्गिक वाटेल असा असावा. योग्य आकारात व व्यवस्थितपणे कोरलेल्या भुवया तुम्हाला सुंदर बनवतात. जास्त बारीक किंवा धनुष्याकृती भुवया तुम्हाला प्रौढ लुक देतात. 

- शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा. योग, एरोबिक्स किंवा चालण्यासारखा  व्यायाम तुम्हाला निरोगी सुडौल बनवतो. 

-केसांची व त्वचेची नियमित देखभाल करा. महिन्यातून एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करा, ज्यामुळे त्वचा सैल पडणार नाही. 


Previous Post Next Post