पाय नेहमी स्वच्छ आणि सुंदर असायला हवेत. पायांना सुंदर बनवणं म्हणजे त्यांना निरोगी ठेवणं आणि पुरेसा आराम मिळवून देणं होय. नेलआर्ट करण्यासाठी, आपले नवीन डिझाइनर फूटवेअर घालण्यासाठी स्वच्छ आणि सुंदर पाय असणे आवश्यक आहे. पेडिक्युअर ही पाय स्वच्छ करण्याची एक पद्धत आहे. नेल क्लिपर, एमरी बोर्ड, टिश्यू पेपर, ऑरेंज स्टिक, नेल पॉलिश रिमूव्हर, कापूस आणि मसाज करण्यासाठी क्रीम हे साहित्य पेडिक्युअर करण्यासाठी तुमच्याकडे असायला हवेत.
पेडिक्युअर करण्यापूर्वी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात खायचा सोडा आणि हायड्रोजन परॉक्साईडचे काही थेंब टाका. या पाण्यात १० -१५ मिनिटांपर्यंत पाय बुडवून ठेवा. जर टाचांवर मळ असेल किंवा त्यावर भेगा पडल्या असतील तर त्या पाण्यातच ब्रशने साफ करा. नखांमध्ये घाण अडकली असेल तर ऑरेंज स्टिकवर कापूस गुंडाळून ती साफ करा.
- प्रथम नेल क्लिपरने नखं कापून घ्या. पायाची नखं नेहमी लहान ठेवा.
- एमरी बोर्डने नखांचा खरखरीत भाग हलकेच घासा. जर नखांच्या आजूबाजूची त्वचा किंवा नखं कडक असतील तर फॉइल वापरा.
- आता क्रीमने यांना चांगल्या प्रकारे मालिश करा. नेहमी खालून वरच्या दिशेला मालिश करा. याप्रकारेच तळव्यांनाही मालिश करा.
- बोटांवर थोडी क्रीम लावून क्युटिकल्सना देखील मसाज करा. ऑरेंज स्टिकच्या मदतीने नखांमध्ये क्रीम लावा.
- दोन बोटांच्या मध्ये कापसाच्या घड्या ठेऊन नखांना नेल पॉलिश लावा. पहिल्यांदा एक बेस कोट लावा.
- नंतर नेल पॉलिशचा टॉप कोट लावा. नेल पॉलिश नेहमी तीन स्ट्रोकमध्ये लावा.
नेल पॉलिश लावल्यावरच पेडिक्युअर पूर्ण होईल. आठवड्यातून एकदा तरी पेडिक्युअर करा. जर स्वतःला पेडिक्युअर करताना समस्या येत असतील तर अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने ही प्रक्रिया करा.