चाफेकळीसारखे सुंदर नाक दिसण्यासाठी नाकाचा मेकअप कसा करावा? ...



"बघ बघ कशी नाकाने बोलतेय", "नाक तर हवं काही बोलायला?", "या सर्व गोष्टींमुळे माझं नाक कापलं गेलंय  सर्वांसमोर... " असे वाक्य तर तुम्ही ऐकलेच असणार. यावरून आपले नाक किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला कळलंच असेल. हा झाला गमतीचा विषय मात्र सरळ आणि चाफेकळीसारखं नाक तुमच्या चेहऱ्याला अजून उठावदार बनवते. जर आपल्या नाकामध्ये काही कमीपणा असेल तर मेकअपद्वारे ती कमतरता लपवता येऊ शकते. मेकअपने तुमचे नाक तुम्हाला सुंदर बनवता येईल फक्त फॉलो करा खाली दिलेल्या खास टिप्स... 

- जर तुमचे नाक जाड आणि बेडौल असेल तर नाकाच्या वरच्या भागावर फाउंडेशनचा हलका थर लावा. आणि आयब्रोपासून नाकाच्या टोकापर्यंत डार्क टोन लावा. 

- नाक जर जास्त लांब असेल तर नाकाच्या आजूबाजूला डार्क टोन द्या. यामुळे नाक सुंदर दिसेल आणि त्याला योग्य आकार प्राप्त होईल. 

- नाकाचा मेकअप करताना विशेष काळजी घ्या. नाकावर मेकअपचे थर लावल्याप्रमाणे दिसता कामा नये. 

- नाकाच्या आजूबाजूची त्वचा तेलकट असते. त्यावर धूळ माती जमून ब्लॅकहेड्स तयार होतात. म्हणून फेशियल करताना नाकावरील ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढून घ्या. 

- नथ, चमकीमध्ये किंवा खड्यांमध्ये साबण किंवा मळ जमा होतो तो आठवड्यातून एकदा तरी साफ करा. 

Previous Post Next Post