कोरोनामध्ये पार्टनरला भेटू शकत नाही? या छोट्या छोट्या टिप्स करू शकतात तुमची मदत...

कोरोना परिस्थती, लॉकडाउन पर्व आणि कर्फ्यू यामुळे कपल्समध्ये विरह आलेला आहे. पण आता मात्र काही चिंता करण्याची गरज नाही. काही कपल्स कोरोनामुळे वीकेंडला भेटू शकत नाही, त्यामुळे कपल्सच्या बऱ्याच डेट्स पेंडिंग आहेत. ते कपल्स या खास टिप्सद्वारे आपल्या पार्टनरला खुश करू शकतात आणि एकमेकांमधील अंतर काही प्रमाणात कमी करू शकतात. 

व्हीडिओ कॉलवर मन मोकळे करा. 

कोरोनामुळे उगाच चिंतीत होऊ नका. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा संपूर्ण वापर करा. आपल्या पार्टनरला व्हीडिओ कॉल करा. यामुळे तुमचा पार्टनर कितीही अंतरावर असेल तरीही तो तुमच्या जवळ असल्याची अनुभूती तुम्हाला होईल. कोरोना काळात आपल्या पार्टनरशी संवाद साधायचा हा उत्तम मार्ग आहे. 

प्रत्येक समस्या फोनवरून सोडवा. 

खरं तर परिस्थिती अशी आहे की, कपल्समधील मोठ्या समस्या फोनवर सोडवता येणे अवघड आहे. पण मोठ्या समस्या तयार होणारच नाही, याकडे लक्ष द्या. कपल्समध्ये सध्या हा समजूतदारपणा असणे गरजेचे आहे. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट पार्टनरला सांगण्याची इच्छा होते. पण कोरोना भेट होऊ देत नाही. म्हणून कसलाही इगो न ठेवता स्वतःहून पार्टनरला कॉल करा आणि बोला. यामुळे तुमच्या नात्यातला गोडवा छान टिकून राहील. 

शहरात कर्फ्यू आणि रुसलेला पार्टनर. 

तुमचं पार्टनर तुमच्यावर रुसून बसलंय. तुमचं फोन उचलत नाही आहे, मॅसेजचं रिप्लाय देत नाही, ऑनलाईन येत नाही आणि नाइलाजने तुम्ही पार्टनरला भेटायला देखील जाऊ शकत नाही. तर तुमच्या रुसून बसलेल्या पार्टनरला मनवण्यासाठी ऑनलाईन गिफ्ट पाठवा. त्या गिफ्टबरोरब एखादा मॅसेज सुद्धा पाठवू शकता. मग बघा तुमचा पार्टनर लगेच ऑनलाईन येईल. 

स्टेटसद्वारे व्यक्त व्हा. 

काही कपल्स असे असतात ज्यांना बोलताना प्रेम व्यक्त करता येत नाही. पण प्रेम निभावण्यासाठी ते व्यक्त होणेदेखील गरजेचं आहे. तुम्ही पार्टनरला मिस करत आहात तर व्हाट्सअपवर छान गोड स्टेटस ठेऊन आपल्या भावना व्यक्त करा. प्रेमात मोठ्या नाही तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी आनंद देतात. मात्र स्टेटस ठेवताना ते केवळ आपल्या पार्टनरलाच दिसेल अशी सेटिंग करा. कारण इतरांना तो दिखावा वाटून ते त्यावर काही उपहासात्मक प्रतिक्रिया देऊन तुम्हाला नाराजदेखील करू शकतात. 


Previous Post Next Post