मान्सूनमध्ये ओठ फाटण्याच्या समस्येपासून त्रस्त आहात? फॉलो करा या लिपकेअर टिप्स...

ऋतू बदलताना आपल्या शरीराची आपण विशेष काळजी घेत असतो. बदलत्या ऋतूबरोबर आपण आपल्या केसांची, त्वचेची तर्हेतर्हेने काळजी घेत असतो. पण आपल्या ओठांना मात्र विसरुन जातो. ओठांचे देखील आपल्या सौंदर्यामध्ये  भर घालण्यासाठी विशेष योगदान असते. बदलत्या ऋतूसह आपल्याला ओठांची विशेष काळजी घ्यायला हवी. चला तर जाणून घेऊयात मान्सूनमध्ये ओठांना कोमल बनवण्यासाठी काही टिप्स... 

स्क्रब- जसे स्किन वर स्क्रब करून आपण डेड स्किन रिमूव्ह करतो तसेच लिप्स स्क्रबने ओठदेखील स्क्रब करा. यामुळे डेड स्किन रिमूव्ह होते, यासाठी शहद आणि साखरेचं स्क्रब घरीच तयार करता येतो. 

मसाज- रात्री झोपण्यापूर्वी कोकोनट ऑईलने ओठांवर मसाज करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन नीट होऊन ओठ मुलायम होतात. 

लीप बाम- लीप बामच्या मदतीने ओठांचा रुक्षपणा कमी होतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लीप बाम लावून झोपा. 

लिपस्टिक- नेहमी उत्तम दर्जाची लिपस्टिक लावा. यामुळे ओठ काळे पडणार नाहीत. नेहमी लक्षात ठेवा की, घरी आल्यानंतर आपल्या मेकअपसोबतच लिपस्टिक देखील रिमूव्ह करा. 


Previous Post Next Post