केसगळती होत असेल तर चुकूनही 'या' पदार्थांचे सेवन करू नका....


केसगळतीची समस्या आता फक्त प्रौढ व्यक्तींमध्येच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. केसगळतीची समस्या असणाऱ्या लोकांच्या मनात "आपल्याला टक्कल पडणार की काय ?'' अशी भीती सतत असते. हेअर एक्सपर्टसच्या मते चुकीचे आहार, लाइफस्टाइल, वाढते प्रदूषण, तणाव, अनिद्रा, पोषक तत्त्वांची कमी आणि धूम्रपान या कारणांमुळे कमी वयात केस गळायला सुरु होतात. 

 हेअर एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीला दररोज आपल्या आहारात ०.८ ग्राम मात्रेत प्रोटीन घेतले पाहिजे. कारण यामुळे हेअर फॉलिकल्स तयार होतात. आहारात प्रोटीनची मात्रा कमी असल्यामुळे केसगळती होते. याशिवाय व्हिटॅमिन बी आणि आयरनच्या कमतरतेमुळे सुद्धा केसगळती होऊ शकते. काही असे देखील पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने केसांचे नुकसान होऊ शकते, म्हणून तुम्हाला पुढीलप्रमाणे दिलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे लागणार... 

जंक फूड- 

जंक फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर अशा पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असतात. हे पदार्थ तुमचे वजन वाढवण्यासोबतच तुमच्या केसांना कमजोर करतात. जास्त तेलकट पदार्थ खाल्य्याने हेअर फॉलिकल ब्लॉक होतात. ज्यामुळे तुम्हाला केसगळतीची समस्या होऊ शकते. 

जास्त प्रमाणात साखर- 

जे लोक आपल्या आहारात साखरेचा अधिक वापर करतात, त्यांच्या केसांना सुद्धा हानी होऊ शकते. म्हणून तुम्हाला साखरेचा अति सेवन टाळणे गरजेचे आहे. तुम्ही नॅचरल स्वीट जसे की खजूर किंवा गुड देखील वापरू शकता. 

अल्कोहोल- 

अल्कोहोल म्हणजेच मद्याच्या सेवनाने केरोटीन प्रोटीन सिंथेसिसवर चांगला प्रभाव पडत नाही. यामुळे हळू हळू केस कमजोर होऊन तुटण्यास सुरुवात होते. म्हणून तुम्हाला अल्कोहोलचे सेवन टाळायला हवे. 

याशिवाय तुम्हाला नेहमी पौष्टिक आहारच घ्यायला हवा. ताणतणाव यांपासून अंतर ठेवा. याबरोबरच पर्याप्त मात्रेत झोप घ्या. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यावर केसगळतीच्या समस्येपासून तुमची सुटका होईल.    

Previous Post Next Post