हनिमूनला जाणे म्हणजे नववधूच्या आयुष्यात असणारा हा अगदी महत्त्वाचा प्रवास असतो. या प्रसंगासाठी नववधू बरेच विचार आणि पूर्वतयारी करते. मात्र काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येत नाही. लग्नामध्ये जसा सुंदर आणि आकर्षक लुक असतो तसेच आपण हनिमूनमध्ये देखील दिसावे,अशी नववधूची अपेक्षा असते. लग्नामध्ये सुंदर दिसणारी नववधू हनिमूनला गेल्यावरसुद्धा तेवढीच आकर्षक दिसावी म्हणून वाचा काही खास टिप्स...
- प्रवासादरम्यान मेकअप करता यावा म्हणून एक छोटीशी व्हॅनिटी बॅग तुमच्याजवळ असावी. त्यामध्ये एक परफेक्ट 'मेकअप किट नक्की असावी.
- लांब केस बांधण्यासाठी कपड्यांना मॅचिंग हेअर बँड्स आणि क्लिप्स जवळ ठेवा.
- हनिमूनला जाताना कॅज्युअल कपडे, स्कार्फ, गॉगल्स , हलके सॅन्डल किंवा बूट्स जवळ असायला हवेत.
- ट्रीपमध्ये खूप वेळ फिरावे लागत असल्याने कपडे व चप्पल आरामदायक हवेत. बरोबर नेण्यासाठी छोटी हँडबॅग किंवा बॅगपॅक जवळ असावी ज्यात जरुरीचं सामान ठेवता येईल.
- उन्हामध्ये फिरण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन आणि मॉइश्चरायझर नक्की लावा.
- रात्री झोपण्यापूर्वी क्लिंजिंग मिल्कने आपला चेहरा स्वच्छ करा. ज्यामुळे दिवसभर चेहऱ्यावर जमा झालेली धूळ आणि घाण निघून चेहरा स्वच्छ होईल .
- ड्राय आणि वेट टिश्यूज तसेच हॅन्ड सॅनिटायझर जवळ ठेवा.
- मेकअप किट सोबतच आवश्यक असलेली औषधे जवळ असणे आवश्यक आहे.
- प्रवासामध्ये शक्यतो मिनरल वॉटर प्या आणि संतुलित आहार घ्यावा.
वरील सर्व गोष्टींबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली आणि जोडीदाराची पूर्णपणे काळजी घ्यावी.
Tags:
bridals