एखाद दोन मुली सोडल्या तर प्रत्येक मुलगी मेकअप प्रोडक्ट्स आणि कॉस्मेटिक्स करता वेडी असते, हे सत्य कुणी बदलू शकत नाही. म्हणून बाजारात वेगवेगळ्या मेकअप किट मिळत असतात. पण त्या परिपूर्ण आहेत का? एका मेकअप किट बद्दल मुलींच्या मनात बरेचसे प्रश्न असतात. काहीकाहींना असा गैरसमज आहे की, मेकअप किट मध्ये फक्त चेहऱ्यासाठी रंगारंगोटीच्या गोष्टी असतात. आजकाल बाजारात महिलांचे कॉस्मेटिक्स ठेवण्यासाठी 'मेकअप किट किंवा व्हॅनिटी बॅग मिळते. यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार सामान ठेवू शकतो. चला तर जाणून घेऊयात एका परिपूर्ण व्हॅनिटी बॅगमध्ये काय काय असावे...
- केस विंचरण्यासाठी नरम दाताचा ब्रश, बारीक कंगवा. केस गळू नयेत म्हणून लाकडी कंगवा वापरणे उत्तम ठरेल.
- सुगंधी तेलाची छोटी बाटली.
- उत्तम दर्जाचे क्लिंजिंग मिल्क.
- एस्ट्रीजंट लोशन.
- उत्तम दर्जाचे कोल्ड क्रीम.
- उत्तम दर्जाचे फेस पावडर, मेकअप ब्रशेस.
- उत्तम दर्जाचे फाऊंडेशन.
- टिकल्यांचं पाकीट, सेफ्टी पिन्स.
-आय लाइनर, मस्कारा, ब्लशर.
- एक डार्क आणि एक लाईट रंगाची आयशॅडो.
- नेल पॉलिश, नेल रिमूव्हर.
- बारीक काळ्या पिना, छोटे मोठे रबर बॅण्ड.
- ड्राय अँड वेट टिश्यूज.
- तुमचा सुंदर चेहरा बघण्यासाठी छोटासा आरसा.
वरील सर्व सामान ठेवण्यासाठी कापडाची खूप कप्पे असणारी व्हॅनिटी बॅग उपयुक्त असते.