जाणून घ्या, कॅज्युअल मेकअप करण्याची योग्य पद्धत..


मेकअप करण्याची आवड आहे पण मेकअप करता येत नाही... मेकअप करणे शिकायचे आहे तर कॅज्युअल मेकअप पासून सुरुवात करणे उत्तम ठरेल. कॅज्युअल मेकअप हा मेकअपचा असा प्रकार आहे, जो दररोज केला जातो. या मेकअपमुळे तुम्हाला नॅचरल लुक मिळतो. कॅज्युअल मेकअप करण्यास इतर पद्धतींच्या मेकअप सारखं वेळ लागत नाही. कॅज्युअल मेकअप हा चटकन होणार मेकअप आहे. तुम्हाला सुद्धा नॅचरल लुक हवा असेल तर कॅज्युअल मेकअप करताना या टिप्स नक्की फॉलो करा... 

- सगळ्यात आधी आपले सगळे केस हेअरबॅण्डने बांधून घ्या. 

- आता क्लिंजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करा आणि त्यावर बर्फ फिरवा. 

- चेहरा वाळल्यावर आपल्या त्वचेशी मिळतंजुळतं फाउंडेशन लावा. चेहरा आणि गळ्यावर एकसारखे फाउंडेशन लावा. 

- आता आपल्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करा. 

- जर डोळे मोठे असतील तर डार्क आयशॅडो लावा आणि डोळे लहान असतील तर लाईट शेड लावा. 

- यानंतर आयलाईनर लावा. काळजीपूर्वक मस्करा लावा. 

- सॉफ्ट ब्रशच्या मदतीने त्वचेला शोभेल असा ब्लशर लावा. शक्यतो केक ब्लशर लावा.


- या सर्वांनंतरच ओठांचे मेकअप करा. पहिल्यांदा डार्क कलरच्या पेन्सिलने ओठांवर आऊटलाईन बनवा. नंतर फिक्कट गुलाबी किंवा तुमच्या स्किनटोनला शोभेल ती कोणतीही फिक्कट रंगाची लिपस्टिक लावा. 

- आता स्वतःच्या वयाला आणि प्रोफेशनली शोभेल अशी हेअरस्टाईल करा. 

- नखानवर लाईट पिंक किंवा सुंदर आणि शोभेल अशी क्लासी नेलपॉलिश लावा. 

- आता एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट इ. घाला. 

 अशाप्रकारे या कॅज्युअल मेकअपमुळे तुम्हाला नॅचरल लुक मिळाल्याने तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसत आहे. 
Previous Post Next Post