लॉकडाउननंतर पार्टनरला भेटणार? तर नात्यातला गोडवा टिकवण्यासाठी वाचा खास टिप्स...


आपण जेव्हा प्रेमात असतो तेव्हा आपल्या पार्टनरसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आपल्यासाठी अमूल्य असतो. कपल्स हे विशेष क्षण कधीच विसरू शकत नाही. पण कोरोनामुळे लॉकडाउन असल्या कारणाने बऱ्याच कपल्सना विरहाचा सामना करावा लागला, लॉकडाउनमुळे बऱ्याच लोकांना भेटणं जमलंच नाही. पण आता बऱ्याच ठिकाणी लॉकडाउन शिथिल करण्यात आलेलं आहे. आता कपल्स भेटण्याचं प्लॅन बनवत आहेत, जेणेकरुन ते एकमेकांसोबत विशेष वेळ घालवू शकतात. अशामध्ये जर तुम्ही भरपूर काळानंतर आपल्या पार्टनरला भेटत आहात तर आपल्या नात्यात अजून गोडवा आणण्यासाठी वाचा 'या' खास टिप्स... 

 पार्टनरला भेटवस्तू द्या. 

तुम्ही बऱ्याच वेळेनंतर आपल्या पार्टनरला भेटत आहात तर त्यांच्यासाठी एखादी भेटवस्तू घेऊन जा. पार्टनरच्या आवडीची भेटवस्तू द्या किंवा स्वतःच्या आवडीने भेटवस्तू न्या. भेटवस्तू देणे आणि घेणे सर्वांनाच आवडते यामुळे तुमच्या नात्यात अधिक गोडवा येईल. 



एकमेकांसोबत वेळ घालवा.

लॉकडाउननंतर भेटत आहात तर तुमच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असेल. जसे की लॉकडाउनमध्ये काय केले?  कुठले नवे उपक्रम राबविले? वेळ कसा घालवला? याबद्दल तुम्ही कॅज्युअली बोलू शकता. फक्त तुमचा पार्टनर बोर होणार नाही याची काळजी घ्या. एकमेकांसोबत सुंदर वेळ घालवा, फ्युचर प्लॅनिंगबद्दल बोला. अशातऱ्हेने परत एकदा आपल्या सुंदर नात्याची गोड सुरुवात करा. 


डिनरला जा.

"प्रेम दिल्याने ते जास्त वाढत असते", असे म्हणतात. यामुळे कुठल्याही नात्याला आपण बळकट करू शकतो. माणसाला खुश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातुन जातो म्हणून डिनर प्लॅन करा.  स्वतःच्या घरी किंवा पार्टनरच्या घरी एक कँडल लाईट डिनर अरेंज करू शकता. यामुळे तुम्हाला भरपूर काळानंतर आपल्या पार्टनरसोबत डिनर करता येईल आणि तुमचे नाते अधिक बळकट होईल.  


पार्टनरचा तणाव कमी करा. 

कोरोना काळामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या तणावात आहे. आपल्या पार्टनरला कशाची गरज आहे?, त्याला काही अडचणी आहेत का?, काही तणाव आहे का? इ. सर्व ओळखा. या सर्व गोष्टी ओळखून आपल्या पार्टनरची जास्तीत जास्त काळजी घ्या, त्याचे तणाव कमी करा. यामुळे तुमचे नाते अजून जास्त समंजस होईल. 

    

    

Previous Post Next Post