लग्नाआधी सोलो ट्रिप प्लॅन करताय? 'हे' भारतीय डेस्टिनेशन्स आहेत उत्तम..

लग्नाआधी प्रत्येक व्यक्ती त्या सर्व गोष्टी करू इच्छितो, ज्या तो लग्नानंतर नाही करू शकत. म्हणून बॅचलर्स पार्टी करणे, मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाणे किंवा एक सोलो ट्रिप करणे इ. गोष्टी महत्त्वाच्या असतात. लग्नानंतर तुम्ही सोलो ट्रिपबद्दल विचारसुद्धा नाही करू शकत, कारण पार्टनरला एकट सोडता येत नाही. म्हणून जर तुम्ही लग्नाआधी सोलो ट्रिपचे प्लॅन बनवत आहात, तर भारतातील काही डेस्टिनेशन्स उत्तम ठरतील कारण ते सुंदर, नयनरम्य तर आहेतंच पण सेफ आणि सेक्युअर्डदेखील आहेत. चला तर थोडा परिचय करूयात काही डेस्टिनेशन्ससोबत... 

चिलिंग लेह (Chilling Leh)

जर तुम्हाला उंच स्थानांची आवड असले तर तुम्ही 'लेह' ला जाऊ शकता. लद्दाखच्या लेहमध्ये ट्रेकिंगसाठी बरेच उत्तम स्पॉट आहेत. चिलिंग हे लेहमधील एक गाव आहे. इथून लेह ७० किमी अंतरावर आहे. या गावाची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे येथील जांस्कर नदी आहे, ही नदी फ्रोजन आहे. फ्रोजन नदीच्या काठी वसलेले हे गाव अतिशय सुंदर आहे. इथे गेल्यावर निसर्गाच्या कुशीत गेल्यासारखे तुम्हाला वाटेल. इथूनच चादर ट्रेक सुरु होतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही इथूनच ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता. 

पॉंडिचेरी (Pondicherry/ Puducherry)

पॉंडिचेरी हे डेस्टिनेशन तुमच्यासाठी बेस्ट आहे, हे डेस्टिनेशन बजेट-फ्रेंडली आहे. असे म्हणतात, तामिळनाडूपासून १६० किमी अंतरावर असलेल्या या जागी तुम्हाला फ्रांसमध्ये असल्यासारखे वाटते.  येथील लोक तमिळ आणि इंग्रजीपेक्षा जास्त फ्रेंचमध्ये बोलतात, कारण इथे एक फ्रेंच कॉलोनी आहे. येथील रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये तुम्हाला फ्रेंच साइन बोर्ड बघायला मिळतील. पॉंडिचेरीमधील बीचेस खूप सुंदर आणि नयनरम्य आहेत. बीचेसवर जास्त गर्दी नसते, म्हणून तुम्ही इथे सकाळी-सकाळी योगा आणि मेडिटेशनदेखील करू शकता. 

अंदमान निकोबार (Andaman and Nicobar)

रात्री चमकत्या समुद्राला बघण्याची तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अंदमान निकोबारला जा. निसर्गाची अविस्मरणीय सुंदरता आणि दूरपर्यंत पसरलेला स्वच्छ सुंदर बीच. आ हा हा... अशा सोलो ट्रीपमध्ये तुम्हाला रिलॅक्स आणि उत्साही वाटेल. रात्री लोक इथे ब्लु सी बघायला येतात. जो बायोलुमिनसेन्समुळे चमकतो. लग्नाआधी स्वतःला सुंदर, मस्त ट्रीट द्यायची असेल तर सोलो ट्रीपसाठी इथे नक्की या. `    

शिलॉंग (Shillong)

शिलॉंग मेघालयमधील एक असे शहर आहे,  जिथे तुम्हाला सात राज्यांच्या संस्कृतीची झलक बघायला मिळेल. शिलॉंगची अजून एक विशेषता आहे की, इथे तुमच्या ट्रान्स्पोर्टचा खर्चदेखील वाचेल कारण शिलॉंग खूप छोटा शहर आहे. त्यामुळे हे शहर तुम्हाला पायी फिरून बघता येईल. शिलॉंगमध्ये कृत्रिम तलाव आहेत, जे या शहराची सुंदरता द्विगुणित करतात.   



















































































































 

Previous Post Next Post