अगं बाई खरंच! पावसात भिजणे देखील आहे लाभदायी? जाणून घेऊयात पावसात भिजण्याचे फायदे...

"चिंब भिजलेले रूप सजलेले, गर्जुनी आले रंग प्रीतीचे" मान्सूनचे आगमन होताच,असे छान आणि रोमँटिक गाणी आठवतात. जवळ जवळ संपूर्ण देशामध्ये मान्सूनने हजेरी लावलेली आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेपासून त्रस्त झाल्यामुळे मान्सूनची सर्व आतुरतेने वाट बघत असतात. मुसळधार पाऊस बघून सर्वांना मज्जा मज्जा वाटते, पावसात भिजण्याची इच्छा होते.  

परंतु तुम्हाला माहिती आहे का? की पावसाच्या पाण्यात भिजल्याने केवळ मन शांत होत नाही तर हे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. पावसात भिजण्याचे बरेच फायदे आहे. चला तर जास्त लांबण न लावता जाणून घेऊयात पावसात भिजण्याचे फायदे...


- त्वचेसाठी पावसाचे पाणी अमृतासमान असते. उष्णतेमुळे झालेल्या घामोऱ्या या पाण्यात भिजल्यावर किंवा या पाण्याने अंघोळ केल्याने बऱ्या होऊ शकतात.

- शरीरात जर कोठेही साधारण खाज सुटली असेल तर या पाण्यात भिजल्याने किंवा या पाण्याने अंघोळ केल्याने ती बरी होऊ शकते.

- मान्सूनमध्ये नेहमी केसगळतीची समस्या होत असते. असे म्हणतात, पावसाच्या पाण्यात भिजल्याने किंवा त्या पाण्याने अंघोळ केल्याने केस स्वस्थ राहतात.

- पावसाच्या पाण्याने अंघोळ केल्याने बॉडी टेम्परेचर नीट राहते आणि रॅशेस येणेसुद्धा बंद होतात.

- पावसाचे पाणी एक अप्रतिम क्लिंजर असते. म्हणून हे पाणी एखाद्या भांड्यामध्ये जमवून ठेवा. झोपण्यापूर्वी हे पाणी त्वचेवर लावा, यामुळे त्वचा डागविरहित आणि मुलायम होईल.

टीप: वरील सर्व सल्ले सामान्य माहिती आहेत. तज्ज्ञांचे मत नाही म्हणून दिलेल्या माहितीचे अनुसरण काळजीपूर्वक करावे.


Previous Post Next Post