मैत्रिणींनो! जाणून घ्या, परदेशातील काही विशेष सौंदर्य टिप्स...


आपण नेहमी टीव्हीमध्ये परदेशी स्त्रिया/ मुली यांना बघत असतो. त्यांचे सौंदर्य भारतातील स्त्रियांसाठी एक आकर्षण आहे. त्यांचे वर्ण, स्वस्थ त्वचा, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा टवटवीत चेहरा बघून "त्या बायका आपले व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी, सौंदर्य द्विगुणित करण्यासाठी काय करत असाव्यात?"।असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. अशाच काही छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा... 

चला तर जाणून घेऊयात परदेशातील काही सौंदर्य टिप्स... 

- आफ्रिकन स्त्रिया आपले सौंदर्य खुलवण्यासाठी जोजोबा ऑईलचा वापर करतात. त्वचा आणि केसांच्या कंडिशनिंगसाठी हे एक प्रभावी तेल आहे. 

- इटालियन स्त्रियांचा चेहरा नितळ आणि हात गुळगुळीत असतात. चेहरा व हातांसाठी त्या ऑलिव्ह ऑइल वापरतात, ज्यामुळे त्वचा मुलायम आणि बेदाग बनते. त्याप्रमाणे त्यांच्या आहारात हर्ब्सचा वापर जास्त प्रमाणात असतो. ज्यामुळे त्यांची सुंदरता कायम राहते. 

- जपानी स्त्रिया एकदम  हलक्या फुलक्या आणि प्रमाणबद्ध असतात. तसेच त्यांचा चेहरा नितळ व टवटवीत असतो. त्यांच्या सौंदर्याचे गुपित म्हणजे 'ग्रीन टी' होय. या 'ग्रीन टी'मुळे कॅलरीज चटकन जळतात आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. तसेच यातील अँटिऑक्सिडंट्स तुम्हाला तरुण आणि निरोगी ठेवतात. 

- पर्शियन स्त्रियांच्या चमकदार आणि सुंदर त्वचेचं रहस्य म्हणजे 'मीठ' होय. एक कप समुद्री मिठामध्ये अर्धा कप पेपरमिंट टी  मिसळून बनवलेली पेस्ट स्नानापूर्वी त्वचेवर चोळतात, यामुळे त्वचा चमकदार आणि स्वच्छ बनते. 

- घनदाट, काळेभोर आणि लांब केस असणाऱ्या स्पॅनिश स्त्रियांच्या सौंदर्याचं गुपित काय बरं असेल? तर 'क्रेनबेरीचा रस' होय. या रसाचा उपयोग त्या शाम्पू केल्यावर केस धुण्यासाठी करतात. 

टीप: वरील कुठल्याही टिप्स फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. 

  

      


Previous Post Next Post