अशाप्रकारे तयार करा तुळशीचे फेस पॅक आणि मिळवा चमकदार त्वचा...


हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. धार्मिक महत्त्व तर आहेच पण या व्यतिरिक्त आरोग्यासाठी देखील तुळशी खूप लाभदायी आहे. आयुर्वेदामध्ये आणि आपल्या प्रिय आजीच्या बटव्यात देखील तुळशीचे अनेक लाभ सांगितले आहेत. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात. तुळशी म्हणजे सुप्रसिद्ध औषधी आहे, जी बऱ्याच रोगांमध्ये उपयुक्त ठरते. त्वचेसाठी सुद्धा तुळशी एका वरदानापेक्षा कमी नाही. त्वचेवरील मुरूम, डाग काढण्यासाठी तुळशी प्रभावी असते. चला तर जाणून घेऊयात तुळशीचे फेस पॅक बनवण्याची विधी... 

साहित्य: 

२०- २५ तुळशीची पाने, १ चमचा संत्राच्या सालीची पावडर, १ चमचा चंदन पावडर, गुलाबजल. 

विधी:

तुळशीचे फेस पॅक बनवण्यासाठी तुळशीच्या पानांचा पेस्ट तयार करावा लागतो. यासाठी तुम्ही पानांमध्ये  गुलाबजलचे काही थेंब टाकून पिसून घ्या. ते नंतर एका वाटीमध्ये काढून घ्या. आता या मिश्रणात १ चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि १ चमचा चंदन पावडर घालून नीट मिक्स करून घ्या. तिन्ही गोष्टींना गुलाबजल सोबत मिक्स करून घ्या.


तुळशीच्या फेस पॅकचे फायदे:

-तुळशीमधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या खोलवर जाऊन स्वच्छता करतात. त्वचेच्या छिद्रांमधील घाण काढून टाकण्याचे आणि डेड स्किन सेल्सना बरे करण्याचे काम करतात. 

- जर त्वचेवर मुरूम किंवा मुरुमांचे पक्के डाग असतील तर तुळशी ते लवकर बरे करण्यास मदत करते. जर तुमची त्वचा कोरडी आहे तर फेस पॅक बनवताना तुम्ही अर्धा चमचा मधदेखील घालू शकता. 

टीप: वरील टिप्स फॉलो करताना शंका येत असल्यास, अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन नक्की करून घ्या.    

     

Previous Post Next Post