आपल्या सुंदर, दाट, काळ्याभोर केसांवर मुलींना नेहमीच गर्व असतो. केसांच्या ठेवीमुळे मुलींचे सौंदर्य द्विगुणित होते. आता बऱ्याच नवीन हेअरकट्स आणि नवीन हेअरस्टाईल्स बघायला मिळतात. त्याबरोबरच केसांची शोभा वाढवण्यासाठी नवनवीन हेअर एसेसरीज निघाले आहेत.काळानुरूप फॅशन ही बदलत असते. कपडे,दागिने, राहणीमान यामध्ये नित्य नवे प्रयोग सुरु असतात. पण "जुनं ते सोनं असते" म्हणूनच केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी पारंपरिक दागिन्यांची माहिती घेऊयात...
सुवर्णफुल:
पूर्वीच्या काळी स्त्रिया खोपा किंवा अंबाडा घालत आणि त्यावर सोन्याचे फुल घातलं जाई. आकड्याच्या टोकाशी सोन्याचं फुल जोडलेले असे. ते अंबाडा किंवा खोप्यावर खोचले जाई. खोप्याच्या दोन्ही बाजूंनादेखील ही फुलं घातली जात.
मोत्याची किंवा सोन्याची वेणी:
मोती गुंफून किंवा सोन्यापासून वेणी किंवा गजऱ्यासारखा आकार बनवला जाई. ही वेणी आकड्याच्या टोकाला बसवलेली असे. अंबाडा किंवा हेअर बन वर ही वेणी घालता येते.
Tags:
Fashion