ऑईली फूड खाल्ल्यानंतर हे छोटंस काम करा, म्हणजे वजन वाढण्याचं टेन्शन राहणार नाही..

"ऑईली फूड! अरे बापरे नको... नको... मी नाही खाणार, वजन वाढलं तर?" अशी भीती अनेकांच्या मनात घर करून बसली आहे.असे बरेच लोक आहेत, जे तेलकट खाण्याआधी खूप विचार करतात. कारण तेलकट खाल्य्याने वजन वाढते म्हणून लोक तेलकट खाणे टाळतात. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणाचा धोका तसेच इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे अनुसरण तुम्ही तेलकट खाल्ल्यानंतर करू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही पदार्थ खाऊ शकता आणि तुमचे वजन देखील वाढणार नाही.

कोमट पाणी-

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे आपली पाचक प्रणाली बळकट होईल, तेलकट अन्न सहज पचेल. याबरोबरच कोमट पाणी पिल्याने शरीरावर जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.


डिटॉक्स ड्रिंक्स-

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक पिणे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी आणि विषारी पदार्थ काढण्यास मदत होते. यासाठी तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर १०- १५ मिनिटांनी एक ग्लास गरम पाण्यात एका लिंबूचा रस मिसळून प्या.

फ्रेश फ्रुट्स-

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर ताज्या फळांचे सेवन करा. यामुळे ऑईली फूडने होणारे नुकसान कमी होते. यांमुळे पचन देखील छान होईल आणि वजन वाढण्याची समस्या सुद्धा येणार नाही.

वरील सर्व टिप्सचे अनुसरण करण्याआधी एक्सपर्ट्सचा सल्ला नक्की घ्यावा.

Previous Post Next Post