मध आणि दह्याचे हेअर मास्क
केसांच्या रुक्षपणा घालवण्यासाठी हा हेअर मास्क बेस्ट आहे. दही आणि मधाच्या मिश्रणाने स्काल्पला गारवा मिळतो. याबरोबरच यामुळे केस कोमलदेखील होतात. एक कप दह्यामध्ये दोन चमचे मध घालून मिश्रण तयार करा आणि स्काल्पवर मसाज करा. या मास्क ला २० मिनटे ठेऊन नंतर शाम्पूने केस धून घ्या.
कढीपत्ता आणि दह्याचे हेअर मास्क
जर तुम्ही केसगळतीच्या समस्येपासून त्रस्त आहात, तर कढीपत्ता आणि दह्याचे वापर करा. कढीपत्त्यामध्ये बीटा केरोटीन आणि प्रोटीन असतात, ज्यामुळे केसगळती होत नाही. अर्धा कप दह्यामध्ये १५-२० पिसलेले कढीपत्ते घालून यांचे मिश्रण बनवा. या मास्कला पूर्ण केसांवर लावा. केसांचे टिप्सदेखील मास्कने नीटपणे कव्हर करा. या मास्कला ४५ मिनटांपर्यंत लावून ठेवा, त्यानंतर शाम्पूने केस धून घ्या.
मेथी, कांद्याचा रस आणि दह्याचे हेअर पॅक
पावसाळ्यात केसांमध्ये डँड्रफची समस्या वाढते. या हेअर मास्कने डँड्रफची समस्या काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. ४ चमचे दह्यात, ३ चमचे कांद्याचा रस आणि एक चमचा मेथी पावडर घालून मिश्रण तयार करा. अर्धा तास हे मिश्रण लावून ठेवा, त्यानंतर शाम्पूने केस धून घ्या.
वरील टिप्सचे अनुसरण तज्ज्ञांच्या किंवा अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने करावे.