नक्की बघा! आपल्या स्टायलिश ऑऊटफिट्स सोबत मॅच करा या ट्रेंडी बॅग्स...

स्टायलिश आऊटफिट्स सह फॅशन ऍक्सेसरीज सुद्धा अपडेट करणे आवश्यक आहे. जसे की, तुमचे आऊटफिट अपडेटेड आहेत पण बॅग त्याच जुन्या फॅशनचे आहे तर मात्र तुमचं व्यक्तिमत्व काही प्रमाणात फिकट दिसतो. म्हणूनच आपले व्यक्तिमत्व अजूनच खुलवण्यासाठी 'या' काही ट्रेंडी बॅग्स आपल्या स्टाईल स्टेटमेंटमध्ये नक्की जोडाव्यात.... 

मुन शेप बॅग

बाहेर जाताने मेकअप किट आणि काही महत्त्वाचे कार्ड्स ठेवण्याकरता मुन शेप बॅग उत्तम पर्याय आहे. तुम्ही या मिनी पर्सला वेस्टर्न आणि फ्युजन दोन्ही लूक्स कॅरी करू शकता. 

 रुमी टोट बॅग

समर सीझनमध्ये टोट बॅग बरेच पॉप्युलर झाले. या बॅगची विशेषता अशी आहे की, बाहेरून ही बॅग खूप छोटी दिसते पण यात आपल्याला बरेच सामान ठेवता येईल. 

कॅण्डी कलर बॅग

फॅशनमध्ये कलरफुल वाइब्स आणण्यासाठी तुम्ही कॅण्डी व्हायब्रंट कलर्स ट्राय करून बघा. फिक्कट रंगाच्या आउटफिट्स बरोबर असे कलर्स जास्त छान दिसतात.

पिलो बॅग 

नावावरूनच कळून येते की, ही उशीच्या आकाराची बॅग आहे. जे लोक बॅगमध्ये जास्त सामान ठेवतात त्यांच्यामध्ये ही बॅग सध्या खूप पॉप्युलर आहे. सामानानुसार ही बॅग त्याच आकारामध्ये समायोजित (एड्जस्ट) होते. 


Previous Post Next Post