मेकअप करताना 'या' गोष्टींची काळजी घेतल्यास मेकअप अधिक काळ टिकेल....

मेकअप करणे सर्वांनाच आवडते पण मेकअप करण्याची कला सर्वांनाच अवगत असेलच, असे नाही. जरी अवगत असले तरीही मेकअप करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून चला तर जाणून घेऊयात मेकअप करताना काय करावे आणि काय करू नये...

- मेकअप करण्यापूर्वी  चेहरा थंड पाण्याने धुवा म्हणजे मेकअप अधिक काळ टिकेल. 

- कन्सीलर आपल्या चेहऱ्यावरील डाग आणि काळपटपणा लपवतो. पण कन्सीलर वापरताना नेहमी आपल्या त्वचेच्या रंगापेक्षा फिकी शेड वापरा. 

- फाउंडेशनच्या ऐवजी त्वचेच्या रंगाशी मिळतीजुळती वॉटरप्रूफ पॅनस्टिक वापरा. 

- ब्लश ऑन नेहमी क्रीमच्या स्वरूपातच असावा. 

- ओठांवर लिप्सटिक लावण्यापूर्वी लिपबाम लावा म्हणजे ओठांचा कोरडेपणा दूर होईल. 

- आयशॅडो व लिप्सस्टिकची निवड पोशाखाच्या रंगाशी मिळतीजुळती असावी.

- हेअर स्टाईल टिकवून ठेवण्यासाठी हेअर स्प्रे वापरा. 

-आपल्या जवळ नेहमी पावडर, ड्राय आणि वेट टिश्यूज असू द्यात. 

- पावडर ब्लशर लावण्यापूर्वी पेट्रोलियम जेली किंवा मॉइश्र्चरायझरचा पातळ थर लावा. 

- डोळे टपोरे आणि सुंदर दिसावेत म्हणून पापण्यांवर आधी हलकी आणि मग डार्क शेड लावा. 

- डोळ्यांच्या पापण्या अधिक आकर्षक दिसाव्यात म्हणून मस्कारा लावण्यापूर्वी हलकेच फेस पावडर लावा. 

- मस्कारा जर अधिक प्रमाणात लागला असेल, तर तो कमी करण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर कॉर्नेल ऑइल घ्या. त्याने मस्कारा साफ करा. 

- डोळे मोठे आणि आकर्षक दिसावेत म्हणून निळ्या रंगाचे आय लाईनर लावा. 

- खालच्या पापणीवर पांढरी आयपेन्सिल लावल्याने देखील लहान डोळे मोठे दिसतात. 

- फाउंडेशन दिवसभर टिकावे यासाठी फाउंडेशन लावण्यापूर्वी ऑइल फ्री मॉइश्चरायझर लावा. 

- चेहऱ्यावरील डाग आणि काळपटपणा दूर करण्यासाठी रात्री कॅलामाईन लोशन लावा. 

- आयब्रोच्या किनाऱ्यावर ऑफ व्हाईट किंवा हलकी हायलायटर लावल्याने डोळे मोठे दिसतात. 

- मेकअप उतरवताना डोळे सोडून संपूर्ण चेहऱ्यावर रिमूव्हर क्रीम लावून ठेवा. थोड्या वेळाने चेहरा धुवा व मॉइश्चरायझर लावा.         

Previous Post Next Post