नक्की वाचा! हेअर स्प्रे, हेअर डाय, हेअर कलर यांचा उपयोग...


आजकल बाजारात हेअर जेल, स्प्रे, हेअर डाय आणि कलर सहज उपलब्ध आहेत. या सर्वांचा योग्य उपयोग पुढीलप्रमाणे... 

- हेअर जेल किंवा स्प्रेचा वापर करून तुम्ही आपल्या केसांची मनपसंत स्टाईल करू शकता. यांच्या वापरामुळे केस आपल्या जागीच राहतात व वाऱ्यानेदेखील तुमची हेअरस्टाईल बिघडत नाही. 

- जेल व स्प्रेचा वापर करून तुम्ही तुमचे केस सहजपणे कुरळे करू शकता, तसेच सेट करू शकता. 

- आपल्या त्वचेचा किंवा केसांचा रंग मेलॅनिन नामक रंगद्रव्यावर अवलंबून असतो. वाढत्या वयासोबत मेलॅनिनची निर्मिती हळूहळू कमी होऊन थांबते. त्यामुळे आपले केस पांढरे होतात. अशा केसांना काळे करण्याचा एक उपाय म्हणजे 'हेअर डाय'. 

- हेअर डाय दोन प्रकारचे असतात: रासायनिक डाय आणि नैसर्गिक डाय. रासायनिक डाय; केसांचे व डोळ्यांच्या त्वचेचे नुकसान करू शकतात, पण नैसर्गिक डाय; केस आणि त्वचा सुरक्षित ठेवतात. 

- जर तुम्ही रासायनिक डाय वापरणार असाल तर केस धुण्यासाठी हर्बल शाम्पू वापरा. 

- रासायनिक डाय केसांतील नैसर्गिकरित्या तयार होणारे तेल व ओलावा नष्ट करतात. म्हणूनच शाम्पूने केस धुतल्यावर केसांना कंडिशनर लावा. 

- केस रंगवण्यासाठी केसांच्या रंगाची मूळ शेडच निवडा. 

- निरोगी केसांनाच कलर करा. केस रुक्ष व अशक्त असतील तर आधी त्यावर उपाययोजना करा आणि नंतर केस रंगवा.    

- पर्म केलेले केस रंगवण्यासाठी ब्युटिशियनचा सल्ला नक्की घ्यावा. 

Previous Post Next Post