नक्की वाचा! व्यक्तिमत्त्वाचे पैलू खुलवण्यासाठी विशेष टिप्स...


प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य, रुप हे वेगवेगळे असतात. कुणी उंच तर कुणी बुटके, कुणी गोरे तर कुणी काळे, एखादा जाड तर एखादा बारीक, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक जडणघडण ही भिन्न असते. मात्र निसर्गाने जे आपल्यला रूप दिले आहे, ते कंस खुलवायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. मेकअप करताना आपली शरीरवैशिष्ट्ये उठुन दिसतील असा मेकअप करावा. खालील काही मुद्दे विचारात घेऊन तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू खुलवू शकता.... 

- सर्वप्रथम आपण आपलं शरीर सुडौल आणि प्रमाणबद्ध बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. आपले नाक-डोळे कसे असावेत हे आपल्या हातात नाही, पण आपलं शरीर निरोगी राखणे आपल्या हातात आहे. 

- आपल्याला प्रसंगानुरूप आणि ऋतूनुसार पोशाखाची  निवड करता यायला हवी. 

- योग्यप्रकारे हेअरस्टाईल आणि मेकअप करावा. 

- नेहमी आपल्या रंगाला आणि शारीरिक ठेवणीला शोभतील असेच कपडे वापरा. सावळा रंग असणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो फिक्या रंगाचे कपडे वापरावेत. जर तूम्ही जाड असाल तर नाजूक प्रिंटचे आणि शरीराबरोबरच बसणारे कपडे वापरा. सैल आणि मोठ्या प्रिंटच्या कपड्यात तुम्ही अजून जाड दिसणार. 

- सुडौल शरीराच्या प्राप्तीसाठी नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. 

- मेकअप करणे म्हणजे महागडी सौंदर्य प्रसाधने चेहऱ्यावर थापणे नव्हे. तर चेहऱ्यातील उणिवा लपवणे आणि वैशिष्ट्ये उठावदार बनवणे होय. 

- सौंदर्यप्रसाधनांच्या निवडीमध्ये फाऊंडेशनला फार महत्त्वाचे स्थान आहे. नेहमी दोन रंगाच्या फाउंडेशनची निवड करा. एक शेड त्वचेशी मिळतीजुळती असावी आणि दुसरी त्वचेच्या शेडपेक्षा डार्क असावी. 

आपल्या चेहऱ्याचा जो भाग उठावदार बनवायचा असेल, त्यावर त्वचेशी मिळतीजुळती शेड लावा. आता चेहऱ्यावरील ज्या भागातील उणिवा लपवायचा असतील तिथे डार्क शेड लावा. 

- फाउंडेशन लावल्यानंतर त्याच शेडच्या कॉम्पॅक्ट पावडरचा हलका थर लावा. 

- रुजू किंवा ब्लशर लावताना नेहमी चिकबोन्सवर लावा. 

- डोळ्यांचं काळजीपूर्वक मेकअप करून तुम्ही 'मृगनयना' बनू शकता. 

- डोळ्यांचा मेकअप करताना सर्वप्रथम आयब्रोजना पेन्सिलने योग्य आकार द्या. त्यानंतर आपल्या वेशभूषेशी मिळत्याजुळत्या रंगाची आयशॅडो लावा. आता डोळे बंद करून पापण्यांवरून आयलाइनरची बारीक रेषा ओढा. मस्कारा लावून पापण्यांना दाट बनवा. सर्वात शेवटी काजळ लावा. 

- लिपस्टिक लावण्यापूर्वी प्रथम ओठांना लिपबाम लावा. त्यावर हलकेच पावडर लावा. आता पेन्सिलच्या मदतीने ओठांची आऊटलाईन बनवा. त्यानंतर लिपस्टिक लावा. दोन ओठांच्यामध्ये टिश्यू ठेवून अतिरिक्त लिपस्टिक काढून घ्या. 

- सगळ्यांत शेवटी आपल्या आवडीचा परफ्युम लावा. 

 

  

   


Previous Post Next Post