'या' पद्धतीने करा आपल्या ब्युटी कॉस्मेटिक्सची देखभाल...



ब्युटी कॉस्मेटिक्स मुलींना खूप प्रिय असतात. कारण जर कॉस्मेटिक्स नाही तर मेकअप नाही आणि मेकअप नाही तर "आता कार्यक्रमात किंवा बाहेर जायचे कसे?" हा प्रश्न पुढे येतो. म्हणून कॅज्युअल मेकअप करता लागणारे कॉस्मेटिक्स तर आपल्याकडे असतातंच
. उत्तम दर्जाचे कॉस्मेटिक्स घ्यायचे असल्यास उत्तम अशी रक्कम सुद्धा त्याकरता मोजावी लागते. बऱ्याच जणींना उत्तम दर्जाचे कॉस्मेटिक्स घ्यायला आवडतात पण त्यांची काळजी नेमकी कशी घ्यावी, हे माहित नसते. त्यामुळे हे साहित्य लगेच खराब होऊन आपले पैसे वाया जातातच, पण त्वचेचे देखील नुकसान होते. चला तर जाणून घेऊयात आपल्या प्रिय ब्युटी कॉस्मेटिक्सची काळजी घेण्यासाठी खास टिप्स...

-कॉस्मेटिक्सचा वापर करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. कारण हातांवर असणारे किटाणू, क्रीम किंवा लोशन खराब करू शकतात. 

- एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ब्युटी प्रोडक्ट्समध्ये कधीही पाणी मिसळू नका. पाणी मिसळल्याने कॉस्मेटिक्सच्या फॉर्म्युल्याचा बॅलेन्स बिघडतो. तसेच त्याच्या रंग आणि गंधावरही परिणाम होतो. 

- प्रसाधनांवर नमूद असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. 

- लिपस्टिक नेहमी थंड जागी ठेवा. 

- कॉस्मेटिक्स बाथरूममध्ये ठेवायचे असल्यास नेहमी बंद कपाटात ठेवा. 

- क्रीम्स किंवा लोशन नेहमी फ्रिजमध्ये ठेवा. 

- जर कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांचा सुगंध कमी झाला असेल किंवा बदलला असले, तर अशी प्रसाधने ताबडतोब फेकून द्या. कारण ती खराब झालेली असतात. 

- जर एखादे क्रीम पातळ किंवा अधिक दाट झाले असेल, त्याचा रंग बदललेला असले तर अशा प्रसाधनांना केराची टोपली दाखवणे उत्तम असेल. 

- शक्यतो ६-१२ महिने होऊन गेलेली आयशॅडो वापरू नये. 

- मस्कारा देखील ६-८ महिन्यांनंतर वापरू नये भले मग तो कितीही चांगल्या कंपनीचा का असेना.

- लिपस्टिक देखील शक्यतो वर्षभरानंतर किंवा एक्सपायरी डेट नंतर वापरू नका. 

- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले ब्युटी कॉस्मेटिक्स कुणासोबतही शेअर करू नका.