"हसरा चेहरा ठेवणेदेखील एक कला"! जाणून घ्या, या कलेत निपुण होण्यासाठी खास टिप्स...



"तू गोड हसतेस"," तू हसल्यावर खूप छान दिसतेस" इ. प्रतिक्रिया आपण नेहमीच ऐकत असाल. आपलं सुहास्य कितीतरी गोष्टी शब्दांशिवाय बोलून जातं. शास्त्रज्ञांच्या मते हसण्यासाठी फक्त दोनच स्नायू काम करतात तर राग व्यक्त करण्यासाठी बत्तीस स्नायूंना काम करावे लागते. केवळ छान कपडे किंवा मेकअप केल्याने तुम्ही सुंदर होत नाही तर एका सौम्य आणि शालीन हास्याने तुमचे सौंदर्य परिपूर्ण होते. म्हणूनच नेहमी हसत राहावे. हसणे हीदेखील एक कला आहे.चला तर जाणून घेऊयात या कलेमध्ये निपुण होण्यासाठी काही टिप्स... 

- नेहमी मनापासून आणि मनमोकळं हसा. 

- नेहमी चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचा विचार करा. 

- चेहऱ्यावर सदा एक हलकेसे स्मित असू द्या. 

- कुणाकडून कधीही कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करू नका. जे तुमच्याकडे आहे त्यात समाधानी रहा. 


- जेव्हा कधी भांडण होईल, तेव्हा हसता हसता एक ते दहा आकडे मोजा. राग आपोआप शांत होईल. 

- स्वतःला सदैव व्यस्त ठेवा. म्हणजे इतर तुम्हाला नको असलेले विचार येणार नाही त्यामुळे तुमचा ताण कमी होईल. 

- नेहमी आनंदी आणि प्रसन्न  व्यक्तीच्या सहवासात रहा. 

- भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करण्यात वेळ घालवण्याऐवजी वर्तमान काळात जगा. 

- लहानसहान गोष्टींमधून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा.

- चांगली पुस्तकं वाचणे, उत्तम संगीत ऐकणे यांसारखे छंद जोपासा. बागकामाची आवड असल्यास ते करा आणि मग बघा निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला कस प्रसन्न वाटेल. एखादे सुंदर पुस्तक किंवा गाणं, एवढंच कशाला झाडाला फुटलेली कोवळी पालवीदेखील तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल. 

- कितीही विकट परिस्थिती असल्यास शांत रहा. धीर कधीही सोडू नका. 

- आपले दुःख कुरवाळत बसू नका, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधा. 

- चूक झाल्यास ती सुधारा आणि त्यातून चांगला धडा घ्या. 

- जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. 

- आपल्या रुटीनमधून वेळ काढून आपल्या जवळच्या जुन्या मित्रमैत्रिणींची नक्की भेट घ्या. 

- विधात्याने आपल्याला घडवलंय तेच सर्वोत्तम आहे असा विचार करा आणि नेहमी आनंदी रहा.