नक्की वाचा! आपलं सौंदर्य द्विगुणित व्हावं म्हणून काही छोट्या पण महत्त्वपूर्ण टिप्स...

निखळ आणि परिपूर्ण सौंदर्याची कामना तर प्रत्येक स्त्री करत असते. पण म्हणून कोणी एका दिवसात सुंदर बनू शकत नाही. त्यासाठी नियमित देखभालीची आवश्यकता असते. आपलं सौंदर्य द्विगुणित व्हावं म्हणून काही महत्त्वपूर्ण टिप्स... 

- उन्हाळ्यामध्ये होणारा हातापायाच्या दाह दूर करण्यासाठी पिकलेल्या पपईचा गर लावा. 

- चेहऱ्यावरील ताण आणि थकवा दूर करण्यासाठी गुलाबपाणी आणि आस्ट्रिजन्ट एकत्र करून लावा. 

- आयब्रो करताना भुवयांवर बर्फाचा तुकडा फिरवा. त्याने वेदना कमी होतील. 

- केसांचा कुरळेपणा नाहीसा करण्यासाठी हातावर थोडं तेल घ्या आणि केसांना वरून खाली मसाज करा. 

- केस चमकदार बनवण्यासाठी शाम्पू केल्यावर केल्यावर लिंबाचा रस मिसळलेल्या पाण्याने केस धुवा. 

- ओठ फुटले असल्यास त्यावर रात्री लिंबाची साल चोळा. 

- नेलपॉलिश लावल्यावर बर्फाच्या पाण्यात बोटं बुडवून ठेवल्यास नेलपॉलिश अधिक काळ टिकते. 

- कोपरांवरचा काळेपणा लिंबाची साल रगडल्याने दूर होतो.

- खरखरीत हातांना ऑलिव्ह ऑइलने मसाज करा म्हणजे ते नरम होतील. 

- चेहऱ्यावरील डाग आणि काळपटपणा दूर करण्यासाठी रात्री कॅलामाईन लोशन लावा. 


Previous Post Next Post