टोनर त्वचेसाठी महत्त्वाचे का आहे? जाणून घ्या, टोनरचा उपयोग कसा करावा आणि त्याचे फायदे...


त्वचेचे तरुणपण टिकवून ठेवण्यासाठी क्लिंजिंग आणि मॉइश्चराइजिंगसह टोनिंग करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. पण बऱ्याच स्त्रिया टोनिंग स्टेप स्किप करतात. ज्यामुळे तुमची त्वचा खराब व्हायला सुरूवात होते. टोनिंग केल्याने त्वचा ढिली पडत नाही. चला तर जाणून घेऊयात टोनिंग करण्याचे फायदे... 

- त्वचेवर टोनरचा उपयोग केल्याने त्वचेच्या आतील भागात येणारी सूज थांबण्यास मदत होते. यामुळे त्वचेवर सूज येत नाही. 

- त्वचेवर नियमित रूपात टोनिंग केल्याने त्वचेवरील रोमछिद्र मोठे आणि ढिले होत नाही. यामुळे त्वचा ढिली पडत नाही. 

टोनरचा वापर कसा करावा? आणि टोनर घेताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी... 

- टोनरचा वापर सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम असतो. पण कोरड्या त्वचेसाठी कोरफळ किंवा काकडीचे टोनर जास्त लाभदायक आहे. याशिवाय तेलकट त्वचेसाठी 'ग्रीन टी'चे टोनर उपयुक्त ठरेल. 

- नैसर्गिक टोनर म्हणून तुम्ही गुलाबजल आणि कच्च्या दुधाचा वापर करू शकता. 

- जर तुम्ही कच्चा दूध टोनर म्हणून लावत आहात तर १० मिनिटांनंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धून घ्या किंवा ओल्या कापडाने त्वचा नीट पुसून घ्या. 

- गुलाब जल किंवा 'ग्रीन टी' चे पाणी टोनर स्वरूपात लावल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता आणि मेकअप सुद्धा करू शकता.