नववधू लग्नात सर्वांत आकर्षक दिसावी म्हणून विवाहपूर्व 'या' गोष्टींची काळजी नक्की घ्या...


 विवाह सोहळ्यामध्ये नववधू ही अक्रर्षणाचा केंद्रबिंदू असते. म्हणून जर आपल्या लग्नाच्या दिवशी सर्वांत सुंदर दिसायचे असेल तर त्याची तयारी एक महिना आधीपासूनच करायला हवी. चला तर जाणून घेऊयात 'ब्युटी एक्सपर्टने' दिलेल्या विवाहपूर्व खास टिप्स...
  
विवाहाच्या एक महिनापूर्व:

- लग्नाच्या तयारीची सुरुवात डिटॉक्सिफिकेशनने करा. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढणे. जंकफूड खाणे टाळा. त्याऐवजी फळं आणि भाज्यांचं सेवन अधिक करा. यामुळे अतिरिक्त चरबी कमी होईल. 
- डॉक्टरच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन सुरु करा. ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होईल. 
- दिवसातून किमान १-२ लिटर पाणी प्या. 


- डीप क्लिंजिंग करा, स्टीम घ्या, जेणेकरून तुमची त्वचा मुलायम होईल आणि त्वचेतील रक्तसंचरण वाढेल. ब्लॅकहेड्स असतील तर स्टीम घेतल्यावर काढा आणि नंतर थंड पाण्याने धून घ्या. फेस मास्क लावा. 
- दररोज हलके व्यायाम करणे किंवा चालायला जाणे उत्तम राहील. 
- आवळा आपलं शरीर निरोगी ठेवतो. शक्यतो रोज उपाशीपोटी एक आवळा खा. 
- घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लोशन लावा. शक्यतो स्कार्फ,ओढणीने किंवा हॅटने आपला चेहरा आणि केस झाकून घ्या. केसांना नियमित तेल लावा. 
- आठवड्यातून किमान एकदा तरी स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल. 
- योगा, जिम जॉईन करा. किंवा नियमितपणे व्यायाम करत असाल तर ते नियमितपणे सुरु ठेवा. यामुळे आपले शरीर आकर्षक बनेल. 

तीन आठवडे आधी:


- पुरेशी झोप घ्या. ज्यामुळे त्वचा सुंदर आणि डोळे चमकदार बनतील. तुम्हाला नेहमी फ्रेश वाटेल. 
- नखांची काळजी घ्यायला सुरुवात करा. नखं लांब ठेवू नका, त्यामुळे ती तुटतील.
- झोपण्यापूर्वी क्लिंजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करा. 
- डोळ्यांच्या आसपास सूज असेल तर सौम्य आयक्रीम किंवा जेल वापरा. आयक्रीम शक्यतो फ्रिजमध्ये ठेवा. याशिवाय थंड पाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवा. झोपण्यापूर्वी मेकअप काढूनच झोपा. 

दोन आठवडे आधी:

- आता तुमच्या लक्षात येईल की आधीच्या दोन आठवड्यात नीट काळजी घेतल्यामुळे तुमची त्वचा उजळ आणि चमकदार बनलेली असेल. आता पुढील दोन आठवडे जरा विशेष काळजी घ्यायला हवी. 
- झोपताना चांगलं नाईट क्रीम वापरा, जेणेकरून त्यातील व्हिटॅमिन्स आणि अँटीएजिंग घटक आपला परिणाम दाखवतील. 
- जसजशी लग्नाची तारीख जवळ येणार तसतसं मानसिक ताणतणाव शॉपिंगची धावपळ यामुळे चेहऱ्यावरील डाग अधिक गडद होऊ लागतात. म्हणूनच झोपण्यापूर्वी डाग दूर करणारे क्रीम लावा.


 - रिलॅक्सिंग मसाज, योगा, मॉर्निंग वॉक, अरोमाथेरेपी यांसारख्या ताण दूर करणाऱ्या उपायांचा अवलंब करा. 
- फायनल हेअर कट करा. लग्नाच्या दिवशी जी हेअर कट तुम्हाला हवी, त्या हेअर कटची ट्रायल घ्या.  
  
Previous Post Next Post