केस धुण्यासाठी शाम्पूचा नाही तर मातीचा वापर करा, जाणून घ्या फायदे...

बाजारात केसांसाठी बरेच प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. स्त्रिया या ब्युटी प्रोडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करतात. पण खरं तर केसांच्या अडचणींसाठी या ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा घरगुती उपाय जास्त उपयुक्त ठरतात. केसांसाठी शाम्पूपेक्षा केस धुण्याची माती जास्त छान असते. भारतीय महिला पिढ्यांपिढ्या पासून मातीने केस धुत आहेत. ग्रामीण भागात स्त्रिया स्वच्छ मातीने केस धुतात. पण शहरी भागात केस धुण्यासाठी स्वच्छ माती मिळणे अवघड आहे. अशा परिस्थितीत मुल्तानी मातीचा वापर देखील तुम्हाला केस धुण्यासाठी करता येईल. केस धुण्यासाठी मुख्यतः तीन प्रकारच्या क्ले प्रसिद्ध आहेत ते म्हणजे रैजॉल/गैजॉल, बेटोनाइट आणि केओलिन. चला तर जाणून घेऊयात मातीने केस धुण्याचे फायदे... 

- मातीने केस धुतल्याने स्काल्प आणि केसांमधील घाण निघून जाते. केसांवरील तेलकटपणा देखील यामुळे योग्यरीत्या निघून जातो. 

- मातीने केस धुतल्याने केस शाईनी आणि मुलायम होतात. 

- केस धुण्यासाठी मातीचा वापर केल्याने केसांचे पीएच लेवल मेंटेन राहते. पीएच केसांचे बॅक्टरीया आणि फंगसपासून बचाव करतो, नॅचरल मॉइश्चर आणि ऑइलला लॉक करून केसांना मुळापासून मजबूत बनवतो.

विशेष काळजी: मातीने केस धुतल्यावर तुम्हाला कुठली एलर्जी तर होणार नाही, हे जाणून घेण्यासाठी बाजारातून माती घेतल्यानंतर एकदा टेस्ट करून घ्या.  

Previous Post Next Post