लग्नात वधू आकर्षक दिसावी म्हणून 'या' गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे...

 

विवाह सोहळा म्हटलं की, नजरेसमोर सुंदर, सालस, नाजूक अशा वधूची प्रतिमा येते. लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या सोहळ्यात सगळं परिपूर्ण असावं, असं सर्वांना वाटतं.  मुली आपल्या लग्नासाठी बरेच विचार आधीच  करून ठेवतात. सौंदर्य कसं वाढवणार? लग्नात कुठला लुक करायचा? कुठली हेअरस्टाईल करायची? असे बरेच विचार मुली विवाहपूर्व करतात. पण लग्नात मात्र त्या सर्व विचारांचा फज्जा होतो. आपल्या मनासारखे काहीच होत नाही. शेवटी वेळ हातातून निघून जाते आणि मग वेळेवर जमेल तशी तडजोड करावी लागते. आपल्या मनासारखं का होत नाही? तर आपण बऱ्याच गोष्टींची काळजी घेत नाही. चला तर जाणून घेऊयात विवाहपूर्व कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी....

- डीप क्लिंजिंग फेशियल करा. 

- नरम, मुलायम त्वचेच्या प्राप्तीसाठी मॉइश्चराइजिंग मास्क लावा. 

- अंघोळीनंतर आठवणीने बॉडी लोशन लावा. 

- लग्नाच्या दोन चार दिवस आधी मॅनिक्युअर, पेडिक्युअर करा. 

- शक्यतो उन्हात  फिरू नका. काही कारणासाठी बाहेर पडलात तर उन्हापासून आपले रक्षण करा. 

- खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. फळं, सलाड जास्त प्रमाणात खा. भरपूर पाणी प्या. 

- नियमितपणे व्यायाम करा. 

या टिप्समुळे तुम्ही स्वतःला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवू शकता. आपल्या रुपासोबतच व्यक्तिमत्वदेखील आकर्षक व्हावं म्हणून काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. 

- खांदे झुकवून चालू नका. नेहमी मान आणि खांदे ताठ ठेवून चला. यामुळे तुमच्यातला आत्मविश्वास दिसून येतो.

- कपड्यांची निवड काळजीपूर्वक करा. साडी असो व लेहेंगा नीटनेटकेपणे परिधान करा. 

- जर तुमची उंची कमी असेल तर उंच टाचेचे चप्पल किंवा सँडल वापरा. जर उंची जास्त असेल तर फ्लॅट चप्पल वापरा. 

- चुडीदार, वेस्टर्न कपडे घालत असाल तर ते योग्य फिटिंगचे असावेत. कपड्यांची निवड ऋतूनुसार असावी. 

- आपल्या मृदू आणि अदबशीर व्यक्तिमत्वाने सासरच्यांनी मनं जिंकून घ्या. 

- आपल्याकडे लग्नानंतर विविध रीतिरिवाज, सणवार, धार्मिक विधी असतात. या सर्व कार्यक्रमांसाठी तयार होताना अगदी हलका मेकअप करा. जास्त भडक मेकअप केल्याने आकर्षकपणा ढळतो. असा मेकअप करा ज्यामुळे तुम्हाला नॅचरल लुक येईल. 

- आजकाल शिक्षण आणि नोकरीच्या धकाधकीत आपण आपली पारंपारिक वेशभूषा साडी नेसणं विसरत चालले आहोत. पण धार्मिक विधी किंवा पूजा करताना साडी नेसणं अनिवार्य असतं. म्हणूनच लग्न ठरल्यानंतर आपण योग्य आणि नीटनेटकेपणाने साडी नेसणे शिकून घ्या. म्हणजे लग्नानंतर होणारी फजिती टाळता येईल. 

  

 

Previous Post Next Post