नक्की वाचा! पर्सनॅलिटी इम्प्रुव्ह करण्यासाठी विशेष टिप्स...

फक्त रूप सुंदर असून उपयोग नाही, तर आपले व्यक्तिमत्वदेखील आकर्षक असायला हवे. जर काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण आपले व्यक्तिमत्त्व चांगल्या प्रकारे घडवू शकतो. चला तर मग जाणून घ्या, आमच्यासोबत आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी विशेष टिप्स... 

- पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांचा आदर करा. बहुतेक व्यक्ती आपल्यापेक्षा  खालचा हुद्दा असणाऱ्या किंवा कमी  आर्थिक स्तर असणाऱ्या लोकांशी तुच्छतेने किंवा सोप्या भाषेत अकडने वागतात. असे न करता सर्वांना समान वागणूक द्या. त्यांच्यातील चांगले गुण नक्की आत्मसात करा. 

जर तुम्ही इतरांचा आदर केला तर तुम्हाला पण ते आदराने वागवतील. तुमच्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी नेहमी प्रेमाने बोला. 

- स्वतःच्या चुकांचा खुल्या मनाने स्वीकार करा व त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. चुकून कुणाचे मन दुखावले असेल तर लगेच क्षमाप्रार्थी व्हा. 

- इतरांशी बोलताना नेहमी आत्मविश्वासपूर्वक बोला. तुमचाच जर स्वतःवर विश्वास नसेल तर इतर लोकदेखील तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. 

- वागण्याबरोबरच आपले चालणेदेखील ग्रेसफुल हवे. मोठ्या मोठ्या टांगा टाकत चालण्यापेक्षा हळूहळू डौलदार पावलं टाकत चला. 

- नेहमी विचारपूर्वक आणि तोलूनमापून बोलण्याचा प्रयत्न करा. बोलताना टोमणे मारणे, एखाद्याच्या मर्मावर बोट ठेवणे किंवा शारीरिक कमतरतेची चेष्टा करणे पूर्णपणे टाळा. 

- इतरांचं बोलणे आधी लक्षपूर्वक ऐकून झाल्यावरचं त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करा.

- तुम्ही कोणताही पोषाख घाला पण त्यामध्ये आत्मविश्वासपूर्वक वावरत येईल का? हा प्रश्न लक्षात घ्या. कुठलाही  पोषाख घालून त्यावर आत्मविश्वासपूर्वक वावरा. 

- कपड्यांची निवड नेहमी प्रसंगाला अनुरूप आणि आपल्याला शोभेल अशीच असावी. 

- बातम्या पाहणे, पेपर वाचणे यासारख्या चांगल्या सवयी लावून घ्या. यामुळे तुम्हाला बाहेरच्या जगात काय घडतंय याची माहिती मिळेल. थोडक्यात आणि सोप्या भाषेत अपडेटेड रहा. 

- पुस्तकांपेक्षा चांगला मित्र जगात कुणीही नाही. पुस्तकांना आपले मित्र बनवा यामुळे तुम्हाला एकाकी कधीच वाटणार नाही. 

- आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. कितीही राग आला तरी त्याचे पडसाद आपल्या चेहऱ्यावर उमटू देऊ . राग आलेला असताना कोणतीही कृती करणे व निर्णय घेणे टाळा. 

- शिस्तप्रिय व्हा. इतरांच्या वेळेचा आदर करा. असे म्हणतात, शिस्तप्रिय आणि वक्तशीर माणूसच आयुष्यात खूप मोठी प्रगती करतो. 

- कधीही कुणाची निंदा व उगाच कुणाची स्तुती करू नका. 

- नेहमी वास्तविकतेत जगा. 

- संभाषणचतुर होण्यासाठी प्रयत्न करा, स्वतःमध्ये समयसूचकता आणा. 

- इतरांचा उत्कर्ष बघून स्वतःला दोष देत बसू नका. आपण कसे पुढे जाऊ शकतो नेहमी याचा विचार करा. 

- शक्य असल्यास नेहमी इतरांना मदत करा.

- भय, भीती, काळजी, शंकाकुशंका यांना आपल्यापासून चार हात लांब ठेवा.

-'अशक्य' आहे म्हणून प्रयत्न करणे टाळू नका. त्यासाठी प्रयत्न करा गरज असल्यास इतरांचीही मदत घ्या. 

- प्रसन्न आणि हसरा चेहरा हाच आपला खरा दागिना आहे.   

शेवटचे पण महत्त्वाचे:

कृष्णसिख: "भविष्याचं दुःख वर्तमानाच्या सुखाला खाऊन टाकतं आणि भविष्याचं सुख वर्तमानाच्या दुःखाला दूर नाही करू शकत. म्हणून नेहमी वर्तमानात जगायला शिका."    


Previous Post Next Post