सोळा श्रुंगार म्हणजे काय ? पहिला श्रुंगार : ' तेल मालिश'
विवाहाच्या वेळी नववधूचा सोळा श्रुंगार करण्याची पद्धत अनादी काळापासून चालत आलेली आहे. प्राचीन कवींनी देखील स्त्रीच्या सोळा श्रुंगाराला खूप महत्त्व दिलेलं आहे. लग्नाच्या कालावधीत वधूसाठी 'सोळा श्रुंगार' करण्याची पद्धत आहे, असे नियमितपणे ऐकतो. पण याबाबत क्वचितचं लोकांना माहिती आहे. चला तर मग काय आहेत सोळा श्रुंगार, याची आपण सविस्तर माहिती घेऊया...
पहिला श्रुंगार : तेल मालिश
तेल मालिश हा सोळा श्रुंगारातील पहिला महत्त्वाचा घटक मानण्यात येतो. मालिश केल्याने त्वचा कोमल आणि उजळ बनते. त्वचा कोरडी पडू नये म्हणून तेलाने मालिश करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. पूर्वी मालिश करण्यासाठी बदामाचे किंवा चंदनाचे तेल वापरले जायचे. पण सध्या लोक ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल वापरणं पसंत करतात. तेल कोमट करून संपूर्ण शरीराला शास्त्रशुद्ध मसाज केला जातो. यामुळे शरीर आणि मनावरील सर्व ताण दूर होतात. चित्तवृत्ती प्रसन्न होते. लग्नाआधी सर्वसाधारणपणे पंधरा दिवसांआधी मालिश करायला सुरुवात करतात.