Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील दुसरे श्रुंगार : ' उटणं '

वधूच्या सोज्वळ सौंदर्यासाठी आणि नितळ, चमकदार त्वचेसाठी तेल मालिशनंतर उटणं लावण्याचा सल्ला दिला जातो. उटणं लावल्यानंतर साबण लावण्याची गरजचं पडत नाही. विविध गोष्टी एकत्र करून उटणं बनवलं जातं. सामान्यतः उटणं बनवताना हळद, बेसन, मुलतानी माती, संत्र्याची साल, केशर, गव्हाचा कोंडा, बदाम, लिंबाचा रस, दूध, दही इ.  गोष्टी वापरल्या जातात. 

आपल्या त्वचा प्रकाराला अनुरूप असं उटणं बनवा आणि वापरा. वरील सामग्री वापरून विविध प्रकारची उटणी बनवता येतात. उटण्याचा वापरामुळे मृत त्वचा, अनावश्यक केस दूर होतात. त्वचेमधील रक्ताभिसरण सुरळीत होते, तसेच त्वचादेखील उजळते. त्वचेवरील डाग आणि मुरूमदेखील नाहीसे होतात. भारतामध्ये लग्नाच्या काही दिवसांआधी पासूनच उटणं लावायला सुरुवात होते.   


Previous Post Next Post