Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील तिसरे श्रुंगार :  स्नान 


सोळा श्रुंगारामध्ये स्नान हा एक महत्त्वपूर्ण श्रुंगार मानला जातो. शक्यतो तेल मालिश व उटणं लावल्यानंतर स्नान केलं जातं, जेणेकरून संपूर्ण शरीर स्वच्छ व  प्रफुल्लित व्हावं. कारण त्वचा स्वच्छ आणि निरोगी असेल तरच बाह्य प्रसाधनांमुळे ती अधिक खुलेल. आपल्या देशात स्नान हा दिनचर्येचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. 

 अजूनही काही भागात  'चौक नहाण' हा विवाहाच्या विधींमधील एक महत्त्वाचा भाग आहे. हळद लावून झाल्यानंतर वर किंवा वधूला चौकोनात बसवतात. हा चौकोन चारही बाजूला चार कलश ठेवून बनवलेला असतो. त्यानंतर घरातील स्त्रिया वर किंवा वधूला स्नान घालतात. हाच विधी लग्न झाल्यावर देखील करतात, याला 'हळद उतरवणे' असे म्हणतात. यावेळी वर आणि वधूला समोरासमोरच्या पातळींवर बसवून घरातील ज्येष्ठ स्त्रिया स्नान घालतात. या विधीला नव्या जोडप्याची भरपूर थट्टा-मस्करी केली जाते. 

एकणूच काय स्नान हा एक आनंदाचा आणि हौसेचा भाग आहे. 



  

Previous Post Next Post