Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील चौथे श्रुंगार : विलेपन 


विलेपन म्हणजे विविध गोष्टींचा लेप लावून शरीर स्वच्छ आणि सुगंधित बनवणं. विलेपनामध्ये चंदन प्रमुख स्थानावर आहे. चंदनासोबतच केशर, कस्तुरी, मुलतानी मातीचं विलेपन देखील करतात. विलेपन शक्यतो स्नानापूर्वी किंवा स्नान करताना करतात. 

घरच्या घरी चंदन लेप बनवण्याची सोपी पद्धत :

चंदन लेप वापरल्यास त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतील. तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास देखील मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी चंदन लेप बनवण्याची अगदी सोपी पद्धत...

साहित्य :

चंदन पावडर - १ चमचा 

गुलाब जल - १ चमचा 

कच्चे दूध - १ चमचा 

हळद - चिमूटभर 

कृती : 

सर्व साहित्य एका भांड्यात घेऊन मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण हलक्या हातांनी चेहरा आणि मानेवर लावा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा लेप लावता येईल.       

फायदे : 

१. मुरूम, डाग, सुरकुत्या दूर होतात. 

२. चेहरा टवटवीत दिसेल. 

३. जळलेल्या त्वचेला बरे करण्यास मदत करते. 

४. कोरड्या त्वचेची समस्या दूर होते, त्वचेतील ओलावा राखण्यास मदत होते. 



 

Previous Post Next Post