Series : सोळा श्रुंगार

 सोळा श्रुंगारामधील आठवे श्रुंगार : टिकली / बिंदी 

भारताच्या अनेक भागात टिकली किंवा कुंकू हे केवळ सौंदर्य प्रसाधन नसून सौभाग्याचं प्रतीक आहे. अनेक काव्यांमधून या सौभाग्याच्या लेण्याचं वर्णन आलेलं आहे. आपल्या अनेक हिंदी भाषिक गाण्यांमध्ये याबाबत उल्लेख  आहे. उदा. बिंदिया चमकेगी,  तेरी बिंदिया रे इ. आजकाल गोल, अंडाकार, चंद्रकोरीप्रमाणे विविध आकाराच्या तसेच विविध रंगाच्या टिकल्या मिळतात. पण नववधूच्या चेहऱ्यावर लाल किंवा मरून रंगाचीच टिकली शोभून दिसते.

 बिंदीशिवाय कोणत्याही महिलेचा मेकअप अपूर्ण असतो, असे म्हणतात. काळ बदलला आणि काळासोबत अनेक गोष्टी बदलल्या, त्यामुळे बिंदी अधिकच ग्लॅमरस झाली आहे. हिंदू धर्मात, बिंदी लावणे हा केवळ श्रुंगारच नाही तर विवाहित जोडप्याची परंपरा आणि विधी आहे. विवाहानंतर केवळ विधवा महिला बिंदी लावत नाहीत, त्यामुळे विवाहित महिलांचे कपाळ रिकामे ठेवणे चांगले मानले जात नाही.

Previous Post Next Post