Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील नववे श्रुंगार : काजळ 


"काजळ लावलं की तू खूप सुंदर दिसतेस, काजळ लावलं की तुझे डोळे खूप आकर्षक दिसतात", असे काही तरी तुम्ही नेहमीच ऐकत असणार. असे म्हणतात की डोळे म्हणजे आपल्या भावभावना दाखवणारा आरसाच आहेत. डोळ्यांमधून राग व्यक्त होतो, लज्जा प्रकट होते, तर कधी हे डोळे अत्यंत मिश्किल बनतात. अशा या डोळ्यांचा श्रुंगार करण्यासाठी काजल किंवा सुरमा वापरतात. 

सामान्यतः काजळ हे काळ्या रंगाचं असतं. साजूक तुपापासून किंवा गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेलं काजळ डोळ्यांसाठी उत्तम औषधी असतं. यामुळे डोळे स्वच्छ आणि निरोगी राहतात. आजकाल बाजारात निळ्या, हिरव्या इ. रंगांमध्ये देखील काजल उपलब्ध आहे. काजळ लावलेले डोळे सुंदर आणि आकर्षक दिसतात. म्हणूनच सोळा श्रुंगारामध्ये याचा समावेश केला आहे.   

Previous Post Next Post