Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील दहावे श्रुंगार : लाली / लिपस्टिक 

जाणून घ्या लिपस्टिक लावण्याचे फायदे: 


तुमचे ओठ सुंदर असोत वा सामान्य त्यांना एक नैसर्गिक लाली असते. तरी देखील त्यांना अजून आकर्षक बनवण्यासाठी लाली किंवा लिपस्टिक लावली जाते. पूर्वीच्या काळी ओठ रंगवण्यासाठी पान किंवा तांबूल सेवन केलं जायचं. पण आता ओठ रंगवण्यासाठी किंवा आकर्षक बनवण्यासाठी लिपस्टिकचा पर्याय उपलब्ध आहे. 

 लिपस्टिक लावण्याचे फायदे :

- लिपस्टीकच्या आवरणामुळे तुमच्या ओठांचे धूळीपासून संरक्षण होते. तसेच यामुळे फुटलेले ओठदेखील बरे होतात. 

लिपस्टीक्स या इन्सेंशियल ऑईलयुक्त असल्यामुळे तुमच्या ओठांची काळजी आपोआपच घेतली जाते.

- जर तुम्ही इसेंन्शियल ऑईल असलेली लिपस्टीक निवडलीत तर तुमचे ओठ अधिक सुंदर होतील. बऱ्याच लिपस्टीक्समध्ये इसेंन्शियल ऑईल्स असतात. जे तुमच्या ओठांचं बदलत्या हवामानापासून आणि धूळीपासून रक्षण करतात.

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून जसं तुमच्या त्वचेचं रक्षण करता, तसंच ओठांचे रक्षण करणेही महत्त्वाचे आहे. लिपस्टीक लावल्यामुळे ना फक्त तुमचे ओठ चांगले राहतात. तर त्यासोबतच सूर्याच्या युव्ही किरणांपासूनही ओठांचे संरक्षण होते. तुमच्या ओठांमध्ये त्वचेच्या तुलनेत हानिकारक सूर्यकिरणांपासून रक्षणासाठी कमी मेलनिन असतं. त्यामुळे त्वचेशी निगडीत कोणताही आजार टाळण्यासाठी तुमच्या ओठांची काळजी घेणे फार गरजेचं आहे. त्वचेच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी तुम्ही SPF 15 असलेली लिपस्टीक वापरा.