Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील बारावे श्रुंगार : आळता / आलता 

जाणून घ्या आलता विधीमागील श्रद्धा :


सौभाग्यवती स्त्रीच्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये, तसेच सौभाग्य चिन्हांमध्ये, पायांच्या श्रुंगाराला विशेष महत्त्व दिले गेले आहे. आळत्याला आपल्याकडे सोप्या भाषेत सहसा 'आलता' असे म्हणतात. मेहेंदी किंवा आळत्याने पाय सजवले जातात. आलता हे लाखेपासून बनलेलं लाल रंगाचं द्रव्य आहे. 

आलत्याने  पायांवर विविध प्रकारची कलाकुसर केली जाते. काही विशिष्ट नृत्य प्रकारांमध्ये देखील हातापायांवर आलता लावला जातो. काही ठिकाणी आलत्याला सौभाग्यचं प्रतीक देखील मानतात. 'यत्र नारी पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता' म्हणजे जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, त्यांची पूजा केली जाते, तिथे देवतांचा वास असतो, अशी आपल्या पूर्वजांची या विधीमागील धारणा आहे. 

तसेच या विधीमागे अशी श्रद्धा आहे की, नववधूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. नववधूच्या गृहप्रवेशावेळी आलत्यामध्ये पाय बुडवून तिला घरात प्रवेश करवतात. जेणेकरून तिची लक्ष्मीस्वरूप पाऊलं दारात उमटतील आणि त्यासोबत सुख-समृद्धी घरात येईल. त्यामुळे आलत्याची विधी नववधू गृहप्रवेश करताना सर्वात महत्त्वपूर्ण विधी मानली जाते. तसेच आलता लावल्याने पायाला शीतलता मिळते आणि ताणतणाव देखील कमी होतात.  

Previous Post Next Post