Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील तेरावे श्रुंगार : अत्तर 

ऋतूनुसार कोणते अत्तर खरेदी करावे? आणि ते लावण्याची योग्य पद्धत 


श्रुंगार आणि सुगंधाचं नातं अतूट आहे. म्हणूनच प्रत्येक सौंदर्य प्रसाधनामध्ये सुगंधाचा समावेश केला जातो. मुघलांच्या काळात सुगंधी पदार्थापासून अर्क म्हणजेच अत्तर काढण्याची प्रक्रिया प्रचलित झाली. संपूर्ण श्रुंगार पूर्ण झाल्यावर अत्तर किंवा परफ्युम लावला जातो. अत्तर बनवण्यासाठी गुलाब, मोगरा, चाफा, जाईजुई, रातराणी इ. फुलांचा वापर केला जातो. 

 आयुर्वेदात ऋतूनुसार अत्तर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याच आधारावर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात वेगवेगळ्या सुंगंधाचे अत्तर लावण्यासाठी सांगितले आहे. जसे,

उन्हाळ्यासाठी अत्तर :

उन्हाळ्यात गुलाब, चमेली, खस, केवडा, मोगरा  सारख्या 'थंड' अत्तरांचा उपयोग करावा. उन्हाळ्यात ते शरीर थंड ठेवतात. 

हिवाळ्यासाठी अत्तर :

हिवाळ्यात कस्तुरी, अंबर, केशर, औद यांचे अत्तर लावणे चांगले. कारण त्यांच्यात शरीराचे तापमान वाढवण्याची क्षमता असते.

अत्तर लावण्याची पद्धत :


अत्तर लावण्याची देखील विशिष्ट पद्धत आहे. असे
 म्हणतात की, अत्तर कपड्यावर नाही तर ते थेट शरीरावर लावायचे असते. शरीराच्या ज्या भागांवरील नसा त्वचेपासून जवळ असतात, उदा. मनगट किंवा कानाच्या खालच्या बाजुला किंवा मानेच्या दोन्ही बाजुला अत्तर लावले जाते. 

Previous Post Next Post