Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील पाचवे श्रुंगार : पेहराव 


पोशाख हे लग्नाच्या तयारीचे एक महत्त्वाचे अंग आहे. लग्नात वधूने परिधान केलेली साडी, शालू किंवा लहंगा हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. महाराष्ट्रात विवाहप्रसंगी शक्यतो साडी नेसली जाते. पैठणी, शालू, कांजीवरम, नारायणपेठी, संबळपूरी यांसारख्या भरजरी साड्या नववधूला अधिक सुंदर बनवतात. अक्षतांच्या वेळी वधूला मामांनी घेतलेली पिवळी साडी नेसण्याची प्रथा आहे, जिला 'अष्टपुत्री' म्हणतात.  


  आजकाल काही हौशी वधू विधीच्या वेळी नऊवारी परिधान करतात. साडी सहावारी असो वा नऊवारी, पारंपरिक वेशात नववधू अधिक आकर्षक दिसते. पारंपरिक भरजरी साड्यांची जागा आता डिझाईनर साड्या घेऊ लागल्या आहेत. शिफॉन, जॉर्जेट, प्युर सिल्कच्या साडीवर रेशीम, खडे, मणी, जरदोसी, कुंदन यांनी नक्षीकाम केलं जातं. या साड्यादेखील दिसायला आकर्षक असतात. विशेषतः रिसेप्शनसारख्या रात्री असणाऱ्या कार्यक्रमात रोषणाईमध्ये या साड्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनतात. यामुळे नववधूला एक वेगळा आणि सुंदर लुक मिळतो.     
Previous Post Next Post