Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील चौदावे श्रुंगार : आभूषण 

आपल्या देशात केसांपासून पायांपर्यंत घालण्यासाठी विविध प्रकारचे दागिने बनवले जातात. त्याची आपण माहिती घेऊयात- 


केस : सुवर्णफूल, मोत्याची वेणी, गजरा, बिंदी. 

कान : झुबे, कुड्या, काप, बुगड्या, वेल. 

नाक : नथ, चमकी. 

गळा : चंद्रहार, तन्मणी, पुतळीहार, मोहनमाळ, बोरमाळ, चपलाहार, चिंचपेटी, लफ्फा, कोल्हापुरी साज, ठुशी, सरी, नेकलेस. 


दंड : बाजूबंद 

हात : अंगठी, गोठ, पाटल्या, तोडे, बिलवर, कंगन. 

कंबर : कंबरपट्टा, छल्ला, मेखला. 

पाय : पैंजण, जोडवी, विरोली, इ. 

वर नमूद केलेले सर्व पारंपरिक दागिने झाले. याव्यतिरिक्त हिरे, माणिक, पाचू यांचा वापर देखील दागिने बनवण्यासाठी केला जातो. आजकाल विविध डिझाईनचे वजनदार, तसेच हलक्या वजनाचे दागिने उपलब्ध आहेत. आपण आपल्या आवडीनुसार दागिन्यांची निवड करून स्वतःला आकर्षक बनवा. 

 

   

Previous Post Next Post