सोळा श्रुंगारामधील सातवे श्रुंगार : पुष्प सज्जा
नववधू संपन्न घरातील असो वा सामान्य घरातील असो, फुलांशिवाय तिचा श्रुंगार अपूर्ण आहे. फुलांची वेणी किंवा गजरा अंबाड्यावर शोभून दिसतो. वेणीला गुंडाळलेला सुवासिक गजरा नववधूचे सौंदर्य वाढवतो. त्याबरोबरच थोडीशी मानेवर, कानामागे लावलेली गुलाबाची कळी किंवा फुलांचा गुच्छ केशभूषेला अधिकच आकर्षक बनवतो.
पुष्पसज्जेसाठी शक्यतो सुवासिक फुलंच वापरली जातात, जसं की मोगरा, चाफा, जुई, केतकी, गुलाब, कुंद, बकुळी इ. पण रंगीबेरंगी अबोलीची फुले सुवासिक नसतील तरी तितकेच सुंदर दिसतात. नववधुच्या श्रुंगाराबरोबरच नववधूचे कपडे देखील फुलांनी सजवता येतील. (उदा. नववधूची ओढणी फुलांनी सुंदररित्या सजविल्यास वधूला एक सुंदर आणि मोहक लुक मिळेल.)
Tags:
bridals