'हीट प्रोटेक्‍टंट' सीरम किंवा स्प्रे खरंच केसांना उष्णता आणि उन्हामुळे होणाऱ्या डॅमेजपासून वाचवतात का?

उन्हाळ्यात जास्त उष्णतेचा केसांवर वाईट परिणाम होतो. ज्याप्रमाणे कोणतीही प्लास्टिकची वस्तू उष्णतेमुळे पातळ आणि कमकुवत होते, त्याचप्रमाणे तुमच्या केसांवरही गरम वस्तूंचा वाईट परिणाम होतो. तरीसुद्धा लोक वेगवेगळ्या हेअरस्टाईल करताना केसांवर अनेक प्रकारच्या गरम वस्तू वापरतात, जसे की स्ट्रेटनर, ड्रायर इ. त्यांचा वापर केल्याने केसातील ओलावा निघून जातो. यामुळे तुमचे स्काल्पसुद्धा कोरडे होते आणि तुमचे केस कमकुवत होऊन तुटतात किंवा गळतात. या समस्येपासून केसांच्या बचावासाठी बाजारात अनेक प्रकारचे 'हीट प्रोटेक्टंट्स' उपलब्ध आहेत. हिट प्रोटेक्टंटमुळे केस गळणे, तुटणे कमी होते असा दावा तज्ञांकडून केला जातो. 

हिट प्रोटेक्टंट्स 

 हिट प्रोटेक्टंट्स  तुमच्या केसांना मॉइश्चरायझ करतात, याच्या वापरामुळे केसांमध्ये एक विशेष थर जोडला जातो.  ज्यामुळे केसांना उष्णता आणि उच्च तापमानापासून संरक्षण मिळते. वास्तविक, ते केसांसाठी एक प्रकारचे मॉइश्चरायझर म्हणून काम करतात, ज्यामुळे तुमचे केस उष्णतेमुळे खराब होत नाहीत. ब्लो ड्रायर्स आणि स्ट्रेटनर्समुळे होणार्‍या नुकसानापासून तुमचे केस सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला हिट प्रोटेक्टंट्सचा  वापर करता येईल. तुमचे केस स्टाईल करण्यापूर्वी देखील तुम्ही याचा वापर करू शकता. हिट प्रोटेक्टंट्स  क्रीम, स्प्रे आणि ऑइल स्वरूपात उपलब्ध आहेत.


हिट प्रोटेक्टंट्सचे फायदे 

- केसांचे क्युटिकल्स स्मूथ करण्यासाठी हेअर प्रोटेक्टंटचा वापर होतो. यामुळे केसांमध्ये गुंतादेखील होत नाही. 

- जर केस स्टाइल करण्यापूर्वी याचा वापर करत असाल तर केसांमधील मॉइश्चर टिकून राहील.

- हीट प्रोटेक्‍टंट तुमच्या केसांचे डिहायड्रेशन, हाय हिट आणि ड्राय वातावरणामुळे होणार्‍या डॅमेजपासून सरंक्षण करतात.

- हीट प्रोटेक्‍टंटमुळे तुमची हेअरस्टाईल अधिक वेळपर्यंत सेट राहते. 


तज्ज्ञांच्या मते हिट प्रोटेक्टंटचा वापर कसा कराल?

स्टाइल करण्यापूर्वी आपले केस हिट प्रोटेक्टंट थोडेसे ओले करा. तुमचे केस कोरडे झाल्यावर हेअर स्टाइलिंग टूल्स वापरणे सुरू करा. तुमच्या केसांना कमीत कमी नुकसान होईल असे प्रोडक्ट्स वापरा. तुमचे केस आधीपासून ड्राय असल्यास, केसांवर हिट प्रोटेक्टंट लावल्यानंतर सीरमदेखील लावा.

तज्ज्ञांच्या मते हिट प्रोटेक्टंट खरेदी करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात?

- सिलिकॉन 

- हायड्रोलायझ्ड व्हीट प्रोटीन

क्वाटरेनरी 70

आपल्या केसांवर कोणतेही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी ते सल्फेट आणि पॅराबेन मुक्त फॉर्म्युलापासून बनविलेले असावे, याची खात्री करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हेअर कलर केले असतील, तर कलर सेफ हिट प्रोटेक्टंटचा  वापर करा. जेणेकरून तुमच्या केसांचा रंग फिक्कट पडणार नाही.


Previous Post Next Post