सोळा श्रुंगारामधील सोळावे श्रुंगार : सुहास्य
"हसरा चेहरा ठेवणेदेखील एक कला"! जाणून घ्या, या कलेत निपुण होण्यासाठी खास टिप्स...
- नेहमी मनापासून आणि मनमोकळं हसा.
- नेहमी चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचा विचार करा.
- चेहऱ्यावर सदा एक हलकेसे स्मित असू द्या.
- कुणाकडून कधीही कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करू नका. जे तुमच्याकडे आहे त्यात समाधानी रहा.
- जेव्हा कधी भांडण होईल, तेव्हा हसता हसता एक ते दहा आकडे मोजा. राग आपोआप शांत होईल.
- स्वतःला सदैव व्यस्त ठेवा. म्हणजे इतर तुम्हाला नको असलेले विचार येणार नाही त्यामुळे तुमचा ताण कमी होईल.
- नेहमी आनंदी आणि प्रसन्न व्यक्तीच्या सहवासात रहा.
- भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करण्यात वेळ घालवण्याऐवजी वर्तमान काळात जगा.
Tags:
bridals