"तुझे डोळे खूप सुंदर आहेत" , "काजळ लावल्यावर तुझे डोळे खूप मोहक आणि आकर्षक दिसतात" असे तुम्ही नेहमीच ऐकत असाल. मोहक, टपोरे डोळे तुमचे सौंदर्य अधिकच आकर्षक बनवतात. पण डोळ्यांखाली असलेल्या काळ्या वर्तुळांमुळे तुमचे सौंदर्य आपोआप कमी होते. तसेच उन्हाळ्यात घामामुळे तुमचे डार्क सर्कल्स अजूनच डार्क दिसतात, त्यामुळे तुमचा चेहरा अधिकच थकलेला दिसतो. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी खास उपाय सांगणार आहोत.
सर्वप्रथम जाणून घेऊयात डार्क सर्कल्स होण्याची कारणे...
- जास्त ताण (स्ट्रेस) घेणे.
- व्हिटॅमिन 'इ' ची कमतरता.
- डिहायड्रेशन
- पुरेशी झोप न घेणे.
- डोळ्यांखाली असलेल्या भागाची नीट काळजी न घेणे.
उपाय:
सर्वप्रथम मध्यम आकाराची काकडी घ्या. काकडीचे किस करून रस एका वाटीत काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडे गुलाबजल मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये काढून घ्या. या मिश्रणाला १५ दिवसांपर्यंत फ्रिजमध्ये स्टोअर करता येईल. हे मिश्रण दिवसांतून दोन ते तीन वेळा डार्क सर्कल्सवर लावा.
त्याबरोबरच हे मिश्रण तुम्ही आईस ट्रेमध्ये घालून त्याचे क्युब्सदेखील तयार करू शकता. हे क्युब्स दिवसातून दोनदा डार्क सर्कल्सवर लावा. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण ९०% असते. यामुळे डिहायड्रेशनची समस्या होणार नाही. तसेच काकडीमध्ये असलेले प्रोटीन त्वचा उजळण्यासाठी मदत करतात.
या उपायामुळे तुम्हाला एका आठवड्यात डार्क सर्कल्समध्ये फरक दिसून येईल.